vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डीजे मुक्त आंबेडकर जयंती साजरी करा आणि विवाह सोहळा अर्ध्या तासात संपवा तिसऱ्या धम्म संगीती मध्ये विविध ठराव मंजूर 

डीजे मुक्त आंबेडकर जयंती साजरी करा आणि विवाह सोहळा अर्ध्या तासात संपवा तिसऱ्या धम्म संगीती मध्ये विविध ठराव मंजूर

 

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डीजे मुक्त साजरी करावी, विवाह सोहळा अर्ध्या तासाच्या वेळेत पूर्ण करावा यासह विविध ठराव तिसऱ्या धम्म संगीती मध्ये मंजूर करण्यात आले

बौद्ध समाजाच्या सर्व संघटनाच्या वतीने तिसरी एक दिवसीय धम्म संगीती रामनगर, मुकुंदवाडी येथील तक्षशिला बौद्ध विहारांमध्ये नुकतीच पार पडली त्यात हे ठराव सर्व संमतीने मंजूर करण्यात आले या धम्म संगीतीला अध्यक्षीय मंडळाचे देहू येथील टेक्सास गायकवाड आचार्य रवींद्र भालशंकर भिक्खू डॉ.एम सत्यपाल महास्थवीर राहुल खांडेकर प्रा.डॉ.रवींद्र मुंद्रे अशोक तीनगोटे प्रा.सुधीर कांबळे आदी उपस्थित होते दिवसभर तीन सत्रा मध्ये चाललेल्या या धम्म संगीती मध्ये बौद्ध संस्कार विधी मध्ये एक सारखं पणा आवश्यक आहे बौद्ध सण कोणते आणि कसे साजरे करावे ती पद्धती ठरवणे बौद्ध समाजाने व्यवहारात ब्राह्मणी शब्द त्यागून त्याला पर्यायी शब्द तयार करणे यावर सविस्तर चर्चा झाली यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून काही सूचना केल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी करावे परंतु ती डीजे मुक्त असावी पारंपारिक वाद्य, देखावे आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम राबवून या जयंती साजऱ्या कराव्यात असा मोलाचा सल्ला अध्यक्षीय मंडळातील मान्यवरांनी दिला त्याचबरोबर लग्नविधी सोहळा कमी वेळेत आणि वेळेवर पूर्ण करण्यावर एक मत झाले त्याचबरोबर पाली भाषेचा प्रसार आणि प्रचार जोमाने करावे असेही धम्म संगीती मध्ये ठरविण्यात आले यावेळी विविध ठराव मंजूर करून ते काटेकोरपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.बौद्ध समाजाने व्यवहारात ब्राम्हणी शब्द त्यागून त्याला पर्यायी बौद्ध शब्दावली तयार करून अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावे.बौद्ध सन कोणते असावे आणि कसे साजरे करावे व पद्धती ठरवली पाहिजे.पुढची चौथी धम्मसंगीती नाशिक येथे 4 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये बौद्ध संघटना आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.प्रास्ताविक धम्म संगीति प्रमुख अशोक सरस्वती बौद्ध नागपूर यांनी केले.आभार प्रा.भारत शिरसाट यांनी मानले यावेळी मुख्य आयोजक ज्येष्ठ बौद्धाचार्य व्ही.के.वाघ आसाराम गायकवाड सखाराम धानोरकर प्रा.भारत शिरसाठ सुनील वाकेकर अरविंद अवसरमोल कृष्णा साळवे अनंत भवरे भानुदास बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते

संबंधित पोस्ट

मद्यपान, तंबाखू आणि धूम्रपानासारख्या कायद्याने आक्षेपार्ह असलेल्या जाहिरातींच्या रेल्वेमधील प्रदर्शनावर बंदी: अश्विनी वैष्णव

म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

नावीन्यपूर्ण विकासकामांतून अहिल्यानगरला राज्यातील अग्रगण्य शहर बनविणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलचितळे रोड येथे नेहरू मार्केट भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वराज्य प्रतिष्ठान यांच्यावतीने अन्नधान्य किट वाटप संपन्न

शेतकर्‍यांच्या प्रश्नी शिवसेनेचा आवाज दणाणला…शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त करून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत द्या –जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

शासनाच्या ‘दुर्गोत्सव’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका आयोजित ‘दुर्गबांधणी स्पर्धा’ उपक्रमात मोठ्या संख्यने सहभागी होण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta