vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

मोतीगव्हाण येथील राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधून अनेक युवकांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेशविश्वास दिलात तर विकास हमखास – रावसाहेब पाटील दानवे विकास कामे केली म्हणूनच जनता आमच्यासोबत – आ. बबनराव लोणीकर

मोतीगव्हाण येथील राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधून अनेक युवकांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेशविश्वास दिलात तर विकास हमखास – रावसाहेब पाटील दानवे विकास कामे केली म्हणूनच जनता आमच्यासोबत – आ. बबनराव लोणीकर

 

जालना,  (प्रतिनिधी) – जालना तालुक्यातील मोतीगव्हाण येथील युवकांनी राष्ट्रवादीतून (अजित पवार गट) मधून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर आणि भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून त्यांनी जाहीर प्रवेश केला.

मोतीगव्हाण चे सरपंच विजय मोहिते यांच्या पुढाकाराने व समन्वयातून निवृत्ती कृष्णाजी घडलिंग, छत्रगुण देविदास मोहिते, आबासाहेब नानाभाऊ मोहिते, गौतम पटेकर, अंकुश पटेकर, शिवाजी विलास लाखे, प्रल्हाद डीखूळे, सचिन पटेकर, दादाराव पटेकर, चित्रहार पटेकर, अंकुश पटेकर, पांडुरंग मोहिते, निखील मोहिते आदींनी भाजपात प्रवेश केला

यावेळी श्री. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष हा विकास आणि जनसेवा यांना प्राधान्य देणारा पक्ष आहे. युवकांचा उत्साह आणि ताकद पक्षाला नवी ऊर्जा देणार असून त्यांच्या पाठिंब्यामुळे संघटन मजबूत होईल असे दानवे यांनी सांगितले.

यावेळी आ.बबनराव लोणीकर म्हणाले की, शेतकरी, गरीब, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर भारतीय जनता पक्ष सातत्याने काम करत आहे. मोतीगव्हाण येथील तरुणांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या सहभागामुळे स्थानिक विकासाला आणखी गती मिळेल असे लोणीकर यांनी नमूद केले.

यावेळी महेश निकम, संतोष लोखंडे, सिद्धिविनायक मुळे, वसंत शिंदे, विष्णू मोहिते, महादेव मोहिते, सावळीराम मोहिते, नारायण मोहिते, सुमित सुरडकर, अंकुश बोबडे, ज्ञानेश्वर शेजूळ, रोहित नलावडे, नारायण पवार, संदीप चव्हाण आदींची उपस्थिती होती.

बाबासाहेब पाटील कोलतेप्रसिद्धीप्रमुख भारतीय जनता पार्टी जि.जालना

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या संजय घाडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, ११ फेब्रुवारीला होणार निवड.

vishwatmaklokswamivarta

आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांना 7 एप्रिल पर्यंत कर्ज फॉर्म भरण्याचे आवाहन..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी कोंडवाडे बांधण्याकरिता जागा निश्चित करुन प्रस्ताव सादर करा -उपमुख्यमंत्री

एमएडीसीने इतिहास रचला! अमरावतीविमानतळावर प्रथमच एटीआर-७२ चाचणीविमान यशस्वीरीत्या लँड झाले,प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या युगाची सुरुवात!

महाराष्ट्र आता थांबणार नाही…! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालानुसार महाराष्ट्र सर्वच आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर; दिमाखदार वाटचालीसाठी नागरिकांचे अभिनंदन

राज्यात आता दरवर्षी महसूल क्रीडा स्पर्धा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांमध्ये कोकण विभागाला सर्वसाधारण विजेतेपद, यजमान छत्रपती संभाजीनगर द्वितीय तर पुणे विभागाचा तिसरा क्रमांक..

vishwatmaklokswamivarta