vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रम अंतर्गत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा२१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आरोग्य विभागातर्फे सर्व्हेक्षण व मोफत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया

राष्ट्रीय कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रम अंतर्गत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा२१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आरोग्य विभागातर्फे सर्व्हेक्षण व मोफत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया

जालना, प्रतिनिधी : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रम अंतर्गत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा दि.२१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. सदरील मोहिमेचे घोषवाक्य -’ स्वस्थ व आनंदी कुंटूंबाचे स्वप्न, पुरुषांच्या सहभागातुनच साकार ’ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा पंधरवडा दोन टप्प्या मध्ये होणार आहे. पहिल्या टप्पा – संपर्क आठवडा कालावधी २१ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२५. दुसरा टप्पा – सेवा आठवडा कालावधी दि.२८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५. पहिल्या टप्प्यात पुरुष नसबंदी बाबत जनजागृती करणे, जनतेला पुरुष नसबंदीचे महत्व सांगुन प्रवृत्त करणे, कुंटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही केवळ स्त्रिची जबाबदारी नसुन पुरुषांची सुध्दा आहे, याबाबत समुपदेशन करणे. स्त्री नसबंदी शस्त्रक्रियापेक्षा सोपी व सुलभ असल्याबाबत माहिती देणे व योग्य जोडप्यांच्या याद्या तयार करुन त्यांना संपर्क साधणे व पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेस प्रवृत्त करणे. दुस-या टप्प्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबीरे आयोजित करुन शस्त्रक्रिया करणे. मोफत सेवा देवुन प्रती एक पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया लाभार्थ्यांस १४५१/- रु. प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा या मोहिमेत जास्तीत जास्त पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करुन घ्यावी. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना. यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले

संबंधित पोस्ट

सोप्या गोष्टी अंगिकारून असह्य उन्हाळ्यात काळजी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

कुपोषणमुक्त जालना” साठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत-जिल्हाधिकारी आशिमा मित्तलमिशन न्युट्रीशन जालना अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

क्षय आरोग्य धाम येथे योगासन व ध्यान योग कार्यक्रम

शाळा, अंगणवाडीतील मुलामुलींच्या आरोग्य तपासणीला सुरुवात३३ आरोग्य पथक नियुक्त ; तालुकानिहाय दररोज गावभेटी..

कुटुंबाचा सामाजिक उपभोग : आरोग्य या विषयावर देशव्यापी पाहणी,सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच यशस्वी ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ (गुडघा प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया संपन्न