vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

शाळा, अंगणवाडीतील मुलामुलींच्या आरोग्य तपासणीला सुरुवात३३ आरोग्य पथक नियुक्त ; तालुकानिहाय दररोज गावभेटी..

शाळा, अंगणवाडीतील मुलामुलींच्या आरोग्य तपासणीला सुरुवात३३ आरोग्य पथक नियुक्त ; तालुकानिहाय दररोज गावभेटी..

 

बुलढाणा, प्रतिनिधी : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत १ मार्चपासून जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय शाळा आणि अंगणवाडीतील ० ते १८ वयोगटातील मुलामुलींची आरोग्य तपासणी केली जात आहे.

  या कार्यक्रमांतर्गंत ३३ आरोग्य पथकाकडून तालुकानिहाय गावांमध्ये जावून मुलामुलींची दररोज आरोग्य तपासणी केली जात आहे. यात बुलढाणा ४, मेहकर ३, लोणार २, देऊळगाव राजा २, मोताळा २, नांदुरा २, जळगांव जामोद २, शेगाव २, संग्रामपूर २, मलकापूर २, सिंदखेडराजा २ खामगांव ४ आणि चिखली तालुक्यासाठी ४ आरोग्य पथक नेमण्यात आले आहेत.

आज ‘या’ गावात आरोग्य पथकहे आरोग्य पथक शुक्रवारी दि. ७ मार्च रोजी बुलढाण्यातील सिंदखेड, उंबरखेड, तराडखेड येथील अंगणवाडी आणि जि.प उर्दू शाळा देऊळघाट मधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी तालुकानिहाय दाखल होणार आहे. यासह चिखली तालुक्यातील आसोला, सवना, अंबाशी आणि सोमठाणा, देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगांव (बु), सावखेड भोई, जळगाव जामोद तालुक्यतील पळशी सुपो, खामगांवमधील कांचनपूर, वडजी भेंडी, कुऱ्हा आणि घारोड, लोणार तालुक्यातील कौलखेड, न.प शाळा क्रमांक ३, मलकापूरमधील शनिमंदीर आणि मेहकरमधील वरवंड येथे मुलामुलींच्या आरोग्य तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे.

या तपासणीसाठी नियुक्त पथकामध्ये पुरुष व महिला अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्य सेविका यांचा समावेश आहे. उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थी आणि गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलामुलींची आरोग्य तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. भागवत भुसारी यांनी केले आहे.०००

संबंधित पोस्ट

स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ जिल्हा स्त्री रुग्णालय येथे थेट प्रक्षेपणाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सोप्या गोष्टी अंगिकारून असह्य उन्हाळ्यात काळजी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

आधाता ट्रस्ट तर्फे ज्येष्ठांची कानाची निगा व उपचार मार्गदर्शन संपन्न

vishwatmaklokswamivarta

टी.बी. मुक्त भारतासाठी “निक्षय मित्र” उपक्रमाअंतर्गत पोषण आहार किट वाटप

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ महिलांसाठी आरोग्य शिबीर१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष अभियान

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रम अंतर्गत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा२१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आरोग्य विभागातर्फे सर्व्हेक्षण व मोफत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया

vishwatmaklokswamivarta