vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नावीन्यपूर्ण विकासकामांतून अहिल्यानगरला राज्यातील अग्रगण्य शहर बनविणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलचितळे रोड येथे नेहरू मार्केट भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न

नावीन्यपूर्ण विकासकामांतून अहिल्यानगरला राज्यातील अग्रगण्य शहर बनविणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलचितळे रोड येथे नेहरू मार्केट भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न

​अहिल्यानगर, प्रतिनिधी: बदलत्या काळानुसार शहरांची रचना आणि सुविधा विकसित करणे ही काळाची गरज असून नावीन्यपूर्ण विकासकामांच्या माध्यमातून अहिल्यानगरला राज्यातील अग्रगण्य शहराची ओळख मिळवून द्यावी. सामान्य नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देत सार्वजनिक सुविधा, आधुनिक बाजारपेठा आणि सार्वजनिक उद्यानांसारख्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शहरातील चितळे रोड येथे नेहरू मार्केटचे भूमिपूजन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ​कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर ऍड. धनंजय जाधव, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

​पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, नेहरू मार्केटची स्थापना १९६७ साली झाली असून या बाजारपेठेने शहराच्या व्यापारी विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज या मार्केटला नव्या स्वरूपात ऊर्जितावस्था प्राप्त होत आहे. शहर झपाट्याने बदलत असताना जुन्या शहराच्या पाऊलखुणा जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विकास करताना शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा विसरून चालणार नाही, असेही ते म्हणाले.

लोकांच्या गरजा वाढत असून बदलत्या परिस्थितीनुसार शहराची उभारणी करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोजगार क्षेत्रातही मोठे बदल होत आहेत. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शहरातील सुविधा आणि पायाभूत विकासाची दिशा निश्चित करावी लागणार आहे. आधुनिक बाजारपेठा, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांसाठी दर्जेदार नागरी सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे. शहरात अधिकाधिक सार्वजनिक उद्याने उभारण्यास प्राधान्य देण्यात यावे, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत असून शहर अधिक सुशोभित आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

​ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांसाठीही आधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वतंत्र मार्केट उभारण्याची आवश्यकता आहे. कृषी उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.नावीन्यपूर्ण प्रयोग आणि नियोजनबद्ध विकासातून शहराचे स्वरूप बदलता येणार असून अहिल्यानगरला राज्यातील आदर्श आणि अग्रगण्य शहर म्हणून विकसित करण्यासाठी विकासकामांना गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

असे आहे नेहरू मार्केट​सुमारे ९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या निधीतून तळमजल्यासह तीन मजली मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये ५७ गाळे व ५३ ओटे बांधण्यात येणार आहेत. व्यापाऱ्यांना या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधाही देण्यात येणार आहेत.कार्यक्रमास पदाधिकारी, व्यापारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

संत रोहिदास 650 वी महोत्सव जयंती नियोजन समितीची धारावीत बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी व्यापक उद्देश ठेवून ठोस अंमलबजावणीवर भर द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ला वेग

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘रेड रन’ स्पर्धा

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचीच वर्णी

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta