vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगली जिल्ह्यात 44 गावातील 47 नवीनरास्त भाव दुकानासाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

सांगली जिल्ह्यात 44 गावातील 47 नवीनरास्त भाव दुकानासाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

 सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यातील अन्न धान्य वितरण अधिकारी श्रेणी-2 अंतर्गत मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, वाळवा, आटपाडी, खानापूर-विटा, कडेगाव, पलूस व शिराळा या तालुक्यांतील 44 गावातील 47 नवीन रास्त भाव दुकानांचे जाहीरनामे काढण्याचे प्रस्तावित आहे. जाहीरनामा संबंधित तहसील कार्यालय, पंचायत समिती, गावचावडी व ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आला आहे. इच्छुक व पात्र संस्था, बचतगटांनी जाहीरनाम्यातील अटी व शर्तींची पूर्तता करून विहीत मुदतीत तहसिल स्तरावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मेनाक घोष यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 रास्त भाव दुकान मंजूर करताना विचारात घेण्यात येणारे निकष, अर्जाचा नमुना व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडण्याबाबतची माहिती www.sangli.nic.in⁠ या संकेतस्थळावर दिली आहे. शासनाच्या निर्देशानुसार रास्त भाव दुकानांसाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये (१) पंचायत (ग्रामपंचायत), (२) स्वयंसहायता बचत गट, (३) नोंदणीकृत सहकारी संस्था, (४) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था अधिनियम कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, (५) महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे. गटाची निवड करताना ज्येष्ठ, वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या, अंतर्गत व्यवहार पारदर्शक व परतफेड चोख व नियमित असलेल्या व प्रतिवर्षी लेखापरीक्षण केलेल्या गटास प्राधान्य देण्यात येईल.

प्राधान्यक्रमानुसार रास्त भाव दुकान परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्याच्या समुदायाव्दारे करणे आवश्यक राहील, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये पुढीलप्रमाणे नवीन रास्त भाव दुकानांचे जाहीरनामे काढणे प्रस्तावित आहे.

 तालुकानिहाय एकूण जाहीरनामे व कंसात गावांची नावे पुढीलप्रमाणे अन्न धान्य वितरण अधिकारी श्रेणी 2, सांगली – 4 (कवठेपिरान (दुकान संख्या-2), दुधगाव, नावरसवाडी. मिरज – 4 (मानमोडी, कळंबी, मल्लेवाडी, पाटगाव). तासगाव – 3 (नागेवाडी, तासगाव, तुरची). कवठेमहांकाळ – 5 (नागज (दुकान संख्या 2), कुंडलापूर, दुधेभावी, हरोली). जत – 8 (साळमाळगेवाडी, काशीलिंगवाडी, निगडी खुर्द, रेवनाळ, मायथळ, सालेकेरी, पाच्छापूर, पारधीवस्ती-पांडोझरी). आटपाडी – 5 (शेंडगेवाडी, बेरगळवाडी, गुळेवाडी, माळेवाडी, धावडवाडी). खानापूर-विटा -2 (कुसबावडे, देवनगर). कडेगाव – 2 (कोतीज, वांगरेठरे). पलूस – 1 (अनुगडेवाडी-अमणापूर). वाळवा – 9 (खरातवाडी, पेठ, येलुर, जक्राईवाडी, शिगाव, फाळकेवाडी, ईश्वरपूर (दुकान संख्या 2), उरूणवाडी). शिराळा – 4 (फकिरवाडी, खुंदलापूर, पत शिराळा, बांबवडे).

00000

संबंधित पोस्ट

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

टंचाई असलेल्या ठिकाणचे टँकर प्रस्ताव तातडीने पाठवा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

मुंबई उपनगरासह-ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू

विशेष सहाय्य योजना लाभार्थ्यांना आधार अद्यावतीकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गुजरात मधील बनासकाठा येथे एका फटाके कारखान्यात भीषण आग लागली, ज्यात बॉईलर फुटल्याने मोठा स्फोट झाला आणि 17 जणांचा बळी गेला, तर 3 जण बेपत्ता आहेत.

वारणा धरणग्रस्तांना शेतीयोग्य जमिनींचे वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील