vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेश स्पर्धापरीक्षा १ मार्च रोजी

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेश स्पर्धापरीक्षा १ मार्च रोजी

 

        छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी रविवार दि.१ मार्च रोजी स्पर्धा परीक्षा होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दि. १८ फेब्रवुारी पर्यंत पाठवावे, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चेतना मोरे यांनी कळविले आहे.

            अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांचे अधिनस्त येत असलेल्या प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आादिवासी विकास प्रकल्प, धारणी पांढरकवडा, किनवट, अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुसद, कळमनुरी यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या १२ जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासन मान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी व ८ वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी यास्पर्धा परिक्षेसाठी पात्र राहतील. सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी प्रवेश परीक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांकडून भरुन घेऊन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे सादर करावे. विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. पूर्ण भरलेले अर्ज दि. १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर करावे. असे एकात्मिक आदिवासी प्रकल्प, छत्रपती संभाजीनगरच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती चेतना मोरे यांनी कळविले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या हिंदु धर्मयोद्ध्यांचा कोल्हापुरात भव्य सत्कार !‘मालेगाव स्फोट’ हे ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्याचे काँग्रेसने रचलेले कुंभाड ! – समीर कुलकर्णी यांचा घणाघात

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय अर्थसंकल्प : युवाकेंद्रित, शेतकरीहितासह सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta

नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रम प्रभावीपणे राबविणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

समाज कल्याण विभागाच्या गटई स्टॉल योजनेच्या निकषात सुधारणा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित समता दिंडी, चित्ररथ उत्साहात संपन्न

कोकणातील हृदय पिळवटून टाकणारी घटना: कुमारी आर्या चव्हाण हिच्या क्रूर हत्येचा तारळेत तीव्र निषेध मोर्चा..

vishwatmaklokswamivarta