vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिरूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

शिरूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे प्रतिनिधी-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह, शिरूर जि. पुणे येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ व दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थिनींना शासन नियमांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

इयत्ता ८ वीपासून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या बाहेरगावच्या तसेच शिरूर परिसरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थिनींनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जासाठी hmas.mahait.org या संकेतस्थळाचा वापर करावा.

वसतिगृहात विद्यार्थिनींसाठी मोफत निवास व भोजन व्यवस्था, ई-लायब्ररी, सुसज्ज व्यायामशाळा, पुस्तके व स्टेशनरीसाठी आर्थिक सहाय्य तसेच दरमहा निर्वाह भत्ता विद्यार्थिनींच्या बँक खात्यात जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

प्रवेशासाठी मागील वर्षाचे गुणपत्रक, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुकची प्रत आवश्यक राहणार आहे. अधिक माहितीसाठी व प्रवेश प्रक्रियेसाठी गृहपाल संपर्क क्रमांक – ९५६१०४९४९४ येथे संपर्क साधावा.

0000

संबंधित पोस्ट

राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह #पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता

जालना जिल्ह्यात ‘विपश्यना केंद्रा’ सह बहुउद्देशीय सुविधा उभारणीला गती द्यावी – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

जालना जिल्ह्यातील संत निरंकारी भाविक सत्संगाकरिता दिल्लीस रवाना

vishwatmaklokswamivarta

सांगली पाटबंधारे विभागात पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून  मोठी  ऐतिहासिक आनंदाची बातमी -भारतीय भूमीवर जन्मलेल्या ‘गामिनी’ने दिला ४ बछड्यांना जन्म 🇮🇳

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा-राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे तर अध्यक्षपदी माधव बावगे यांची एकमताने निवड५ प्रधान सचिवांसह ७ सरचिटणीस करणार राज्याचे नेतृत्व..