vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बहार-ए-उर्दू’ चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सुवर्ण महोत्सवानिमित्त ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान कार्यक्रम

बहार-ए-उर्दू’ चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन,राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सुवर्ण महोत्सवानिमित्त ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान कार्यक्रम

मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या स्थापनेस ५० वर्षे पूर्ण होत असून या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘बहार-ए-उर्दू’ महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे. हा साहित्य व सांस्कृतिक महोत्सव ६ ते ८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान एसव्हीपी स्टेडिअम डोम, लाला लजपत राय मार्ग, वरळी, मुंबई येथे होणार आहे.

महोत्सवात उर्दू साहित्य व संस्कृती प्रदर्शन, देशभरातील नामवंत शायर आणि कवींचे कवी संमेलन व मुशायरा, उर्दू भाषेतील साहित्यिकांचा गौरव, पारितोषिक वितरण सोहळा तसेच नाट्य, संगीत आणि विविध कलाविष्कारांचे सादरीकरण होणार आहे. तसेच उर्दू साहित्य आणि भाषाविकासावर संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या महोत्सवात विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमात उर्दू साहित्य, कविता, कला आणि संस्कृतीचा विविधांगी आविष्कार रसिकांना अनुभवता येईल, याचा लाभ घेण्याचे आवाहन विभागाने सर्व उर्दूप्रेमी नागरिकांना केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात-मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा – पालकमंत्री संजय शिरसाट पालकमंत्र्यांनी घेतला विविध विषयाचा आढावा

आज शुक्रवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयएएस आकाश वर्मा, उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे यांचे मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा-22 वा हप्ता होणार 13 मार्चला वितरित,राज्यातील 91 लाख शेतकरी कुटुबांना 1,837 कोटी रुपयांचा लाभसमारोहचे थेट प्रक्षेपन https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर उपलब्ध

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील बँकांची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा”