vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आज शुक्रवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयएएस आकाश वर्मा, उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे यांचे मार्गदर्शन

आज शुक्रवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

आयएएस आकाश वर्मा, उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे यांचे मार्गदर्शन

      अमरावती, प्रतिनिधी: जिल्हा प्रशासन अमरावती यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर क्र. 3’ चे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर शुक्रवार, दि. 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात पार पडणार आहे.

  मार्गदर्शन शिबिरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 20 वा क्रमांक पटकावणारे आयएएस अधिकारी आकाश वर्मा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात 8 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

    सदर शिबीर सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. या शिबिरात यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांची तयारी कशी करावी, अभ्यासाचे नियोजन आणि यशाची सूत्रे यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

पुणे विमान नगर भागामध्ये एका पुणे महानगर पालिकेच्या माथेफिरू संजय पोल या अधिकाऱ्याने ५ वर्ष जुने श्रीराम मंदिर तोडले असता पुन्हा बांधणे सुरू

सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामतालिकेसाठीपात्र व्यक्तींनी ३१ मेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जेजुरी येथे वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्‍न मार्गी लावू; ‘दादांचा वादा’प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यवतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन..

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतालकटोरा स्टेडियमची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी..

vishwatmaklokswamivarta

शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षित, दीक्षित आणि योग्य नागरिक बनवावे : राज्यपाल आचार्य देवव्रत

vishwatmaklokswamivarta