vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षित, दीक्षित आणि योग्य नागरिक बनवावे : राज्यपाल आचार्य देवव्रत

शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षित, दीक्षित आणि योग्य नागरिक बनवावे : राज्यपाल आचार्य देवव्रत

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी  : आधुनिक काळात शिक्षकांना विद्यार्थी घडवणे आव्हानात्मक झाले आहे. आजची मुले स्मार्ट आहे त्यामुळे त्यांना शिकवताना शिक्षकांना अधिक स्मार्टनेस दाखवावा लागेल. मुलांना रागावण्याचे किंवा अपमानित करण्याचे युग गेले आहे, असे सांगताना शैक्षणिक संस्थांनी शिक्षित, दीक्षित आणि उत्तम नागरिक घडवावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.

राज्यपाल देवव्रत यांचा आज देशभरातील डीएव्ही महाविद्यालय शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल उलवे येथील भूमिपुत्र सभागृह येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.राज्यपाल देवव्रत हे डीएव्ही संस्थेचे माजी विद्यार्थी असून ते कुरुक्षेत्र हरियाणा येथे निवासी गुरुकुल चालवतात.

आजच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना माहिती मिळत आहे, परंतु जीवनाचे उद्दिष्ट सांगितले जात नाही. त्यामुळे शिक्षण संस्थांमधून अपूर्ण व्यक्तिमत्त्व निर्माण होत आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.लहान मुले शिक्षकांचे आचरण विचरण पाहत असतात, त्यामुळे शिक्षकांनी आपल्या आचरणातून मुलांपुढे आदर्श ठेवावेत तसेच मुलांना भारतीय जीवन मूल्यांशी जोडावे असे राज्यपालांनी सांगितले.आपण कुरुक्षेत्र येथे अवघ्या सात मुलांना घेऊन गुरुकुल सुरु केले. आज मात्र तेथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून हे गुरुकुल पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात, असे राज्यपालांनी सांगितले.

डीएव्ही संस्थेच्या वतीने झालेला सत्कार हा आपल्याच कुटुंबाकडून झालेला सत्कार आहे, असे सांगताना आपल्या जडणघडणीत महर्षी दयानंद, आर्य समाज व डीएव्ही संस्थेचे मोठे योगदान आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

शैक्षणिक क्षेत्रात डीएव्ही संस्थांनी जितके व्यापक योगदान दिले आहे तितके क्वचितच इतर संस्थांनी दिले आहे असे राज्यपालांनी सांगितले.

सत्कार सोहळ्याला डीएव्ही कॉलेज व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पूनम सूरी, मानद सचिव अजय सुरी, उपाध्यक्ष एस के सोपोरी, प्रबोध महाजन, अनिल कुमार राव, संचालिका डॉ. निशा पेशीन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, संस्थांच्या शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

दिवंगत पत्रकारांच्या नावे स्तंभ बनवा-विकासकुमार बागडी

रायगडमध्ये ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत १२४६ सदस्य आणि १६८ सरपंच पदांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान..

vishwatmaklokswamivarta

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील एका साक्षीदाराने न्यायालयात दावा केला की, दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) त्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) चार नेत्यांची नावे घेण्यास दबाव टाकण्यात आला

vishwatmaklokswamivarta

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, महापौर महायुतीच्या घटकपक्षांच्या चर्चेनंतर होणार – श्रीकांत शिंदे

vishwatmaklokswamivarta

दर्शना पवार हत्याकांड : माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे राहुलचे करू द्या; दर्शनाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया…

फिजी रिपब्लिकने गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान केला…

vishwatmaklokswamivarta