vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

पवई येथील भूखंडसंदर्भात दाखल निवेदनाबाबत अभ्यासानंतर कार्यवाही – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

पवई येथील भूखंडसंदर्भात दाखल निवेदनाबाबत अभ्यासानंतर कार्यवाही – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, प्रतिनिधी : पवईतील पासपोली येथील भूखंडाबाबत दाखल निवेदनासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांसोबत चर्चा व विहित नियमावलीच्या अभ्यासानंतर उचित कार्यवाही करण्यात येईल, असे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

विधानभवनात पवई येथील भूखंड संदर्भात बैठक झाली. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर , जल अभियंता मंगेश शेवाळे व रा.डी. वझिफदार असोसिएट्सचे श्री. दरायुष आर. वझिफदार उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, उच्च न्यायालयाने पवइ तलाव संवर्धन प्रकल्पाच्या अनुषंगाने संबंधित भूखंडांविषयी निर्देश दिले. त्यानुसार जागेचा ताबा घेण्यात आला. मात्र याबाबत आक्षेप दाखल झाला असल्याने याबाबत महानगरपालिका आयुक्तांसोबत चर्चेनंतर कायदेशीर बाबींचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. बनसोडे यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाने 19 जुलै 2016 रोजी संबंधित प्राधिकरणांना पवई तलावाच्या संवर्धन व सौंदर्यीकरणासाठी योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार एकूण 14 जागा विविध व्यक्ती/संस्था यांना भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या. त्यापैकी 05 जागा रस्ता रुंदीकरणासाठी परत घेण्यात आल्या. संबंधितांना नोटिसा देऊन कारण दाखवा आदेशही काढण्यात आले. एमएमसी कायदा कलम 488 अंतर्गत कारवाईत 16 ऑक्टोबर 2024 रोजी जागेचा ताबा घेण्यात आला, अशी माहिती यावेळी देण्यात दिली.

संबंधित पोस्ट

विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मीरा-भाईंदर येथील मेट्रो -9 उडाणपुल क्र.2 चेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

खरीप हंगामासाठी खते, बी-बीयाणे वितरणाचे काटेकोरपणे नियोजन करावे – मंत्री नरहरी झिरवाळ जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते-जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीची बैठक संपन्न

बॅकिंग क्षेत्रात अधिक पारदर्शकतेसाठी डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे – जिल्हाधिकारी आंचल गोयल

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने रॅपिडो या ऑनलाईन प्रवास प्रदान करणाऱ्या कंपनीवर दिशाभूल करणारी जाहिरात केल्याबद्दल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला

vishwatmaklokswamivarta