vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने रॅपिडो या ऑनलाईन प्रवास प्रदान करणाऱ्या कंपनीवर दिशाभूल करणारी जाहिरात केल्याबद्दल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने रॅपिडो या ऑनलाईन प्रवास प्रदान करणाऱ्या कंपनीवर दिशाभूल करणारी जाहिरात केल्याबद्दल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला…

राज्य प्रतिनिधी-केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने रॅपिडो या ऑनलाईन प्रवास प्रदान करणाऱ्या कंपनीवर दिशाभूल करणारी जाहिरात केल्याबद्दल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला,ग्राहकांना नुकसानभरपाई दिली की नाही ते सुनिश्चित करावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद कराव्यात : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण

ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने रॅपिडो (रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड) या ऑनलाईन प्रवास प्रदान करणाऱ्या कंपनीवर दिशाभूल करणारी जाहिरात प्रकाशित केल्याबद्दल आणि अनुचित व्यापार पद्धतीबद्दल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आह. याशिवाय ज्या ग्राहकांनी “पाच मिनिटात रिक्षा अन्यथा 50 रुपये मिळवा” या ऑफरचा पर्याय निवडला होता आणि त्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे नुकसान भरपाई म्हणून 50 रुपये दिले नाहीत, त्यांना ती संपूर्ण रक्कम अधिक विलंबाशिवाय विनाशर्त अदा करावी असे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने रॅपिडो कंपनीच्या “पाच मिनिटात रिक्षा अन्यथा 50 रुपये मिळवा” आणि “रिक्षाची हमी” या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीची दखल घेतली आहे. तपशीलवार परीक्षणानंतर ही जाहिरात चुकीची, दिशाभूल करणारी आणि ग्राहकांची फसवणूक करणारी असल्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने म्हटले आहे तसेच तात्काळ प्रभावाने ही दिशाभूल करणारी जाहिरात बंद करावी, असे निर्देश दिले आहेत.

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) मधील डेटा दर्शवितो:एप्रिल 2023 ते मे 2024 दरम्यान रॅपिडोविरुद्ध 575 तक्रारी.जून 2024 ते जुलै 2025 दरम्यान 1,224 तक्रारी.

रॅपिडोच्या जाहिरातींमध्ये “T&C Apply अर्थात अटी आणि शर्ती लागू ” हा अस्वीकरण (डिस्क्लेमर ) अत्यंत लहान आणि वाचता न येणार्‍या फॉन्टमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता, असे प्राधिकरणाच्या तपासात आढळून आले. तसेच आश्वासन दिल्यानुसार 50 रुपये फायदा प्रत्यक्ष चलनात (रुपयांमध्ये) नव्हता तर “रॅपिडो कॉइन्स” च्या स्वरूपात होता, आणि तरीही, फायदा ” 50 रुपयांपर्यंत” होता आणि प्रत्यक्ष 50 रुपये नव्हता. ही नाणी फक्त रॅपिडो बाईक राईड्सवरच रिडीम करता येत होती आणि त्यांची वैधता फक्त 7 दिवस होती. अशा निर्बंधांमुळे ऑफरचे मूल्य लक्षणीयरीत्या कमी झाले आणि ग्राहकांना अवास्तव कमी वेळेत रॅपिडोची दुसरी सेवा वापरण्यास भाग पाडले. अशा चुकांमुळे खात्रीशीर सेवेची चुकीची छाप निर्माण झाली आणि ग्राहकांना रॅपिडो निवडण्यास भाग पाडले गेले.

याशिवाय “पाच मिनिटात रिक्षा अन्यथा 50 रुपये मिळवा” अशा प्रकारे जाहिरात केली असली तरी अटी आणि शर्तींमध्ये लिहिल्याप्रमाणे ही हमी त्या वाहनाच्या चालकाने वैयक्तिक स्तरावर प्रदान करण्याची जबाबदारी होती आणि रॅपिडोची नव्हे. या परस्परविरोधी भूमिकेमुळे कंपनीकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न झाला, जाहिरातीत दिलेल्या आश्वासनाबद्दलच ग्राहकांची दिशाभूल करण्यात आली.

दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना प्रतिबंध आणि दिशाभूल करणार्‍या जाहिरातींचे समर्थन याबाबत मार्गदर्शक तत्त्वे 2022’ नुसार जाहिरातींमधील अस्वीकरण जाहिरातीच्या मूळ दाव्याच्या परस्परविरोधी असता कामा नये, त्याद्वारे भौतिक माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जाऊ नये किंवा दिशाभूल करणारा दावा दुरुस्त करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ नये. रॅपिडोच्या बाबतीत, ‘गॅरंटीड ऑटो’ आणि ‘5 मिनिटांत ऑटो किंवा 50 रुपये मिळवा’ या दाव्यांमुळे असा समज निर्माण झाला की जर 5 मिनिटांत ऑटो पाठवली नाही तर ग्राहकांना नेहमीच 50 रुपये मिळतील. मात्र लाभ ’50 रुपयांपर्यंत’ मर्यादित असेल आणि ते देखील रॅपिडो नाण्यांच्या स्वरूपात ज्याला कमी वैधता असेल हा भौतिक मर्यादेचा भाग एकतर वगळला गेला होता किंवा समान प्राधान्यक्रमाने दर्शवला नव्हता. या लपवाछपवीमुळे आणि स्पष्टतेच्या अभावामुळे जाहिरात फसवी ठरली, जी मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यकतांचे थेट उल्लंघन करते.

गेल्या दोन वर्षात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनला रॅपिडो च्या विरोधात मिळणाऱ्या तक्रारींचे प्रमाण वाढल्याचे सीसीपीएच्या निदर्शनाला आले आहे. यापैकी अनेक तक्रारी सेवांमधील कमतरता, देय रक्कम परत न करणे, जास्त शुल्क आकारणे, वचन दिलेल्या सेवा प्रदान करण्यात अयशस्वी होणे आणि हमी दिलेल्या “5-मिनिटांच्या” सेवेची पूर्तता न होणे यांसारख्या आहेत. अशा तक्रारींमध्ये सतत वाढ होत असल्याने ग्राहकांच्या असंतोषाचे प्रमाण वाढत आहे, ज्यामुळे सीसीपीएला ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कठोर कारवाई करण्यास प्रवृत्त केले आहे. रॅपिडोला या विषयी सांगूनही यापैकी बहुतेक तक्रारींचे निराकरण झालेले नाही.

संबंधित पोस्ट

बुलढाणा जिल्हा कारागृहात ‘जिवन गाणे गातच जावे’ सांस्कृतिक कार्यक्रम; बंद्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्वीकारला पदभार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते नवाबभाई मलिक पक्षाचे अध्यक्ष सुनिल गिरी यांच्या हस्ते पार्टीच्या मुंबई प्रदेश सचिवपदी आसिफ खान पठाण यांची नियुक्ती ..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबई, वाशी येथील सिडको ऑडिटोरियम येथे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचे उद्घाटन संपन्न

महाडिबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज वेळेत मंजुरीसाठी सादर करा ‘ऑटो रिजेक्ट’ अर्जांना मुदतवाढ मिळणार नाही

vishwatmaklokswamivarta

मंत्री मंगलप्रभात लोढा यांची अभिनव संकल्पना : उद्योजकासाठी प्रशिक्षण मेळावा आयोजन