vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमधील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दात्यांना जुलै 2025 साठीचा जीएसटीआर -3 बी दाखल करण्याच्या अंतिम कालमर्यादेला मुदतवाढ

मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमधील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दात्यांना जुलै 2025 साठीचा जीएसटीआर -3 बी दाखल करण्याच्या अंतिम कालमर्यादेला मुदतवाढ..

 

. मुंबई प्रतिनिधी-मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमधील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दात्यांना जुलै 2025 साठीचा जीएसटीआर -3 बी दाखल करण्याच्या अंतिम कालमर्यादेला मुदतवाढ

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) जुलै 2025 या महिन्यासाठीचा जीएसटीआर -3 बी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम कालमर्यादेला मुदतवाढ देणारी अधिसूचना क्रमांक. 12/2025–केंद्रीय कर दिनांक 20 ऑगस्ट 2025 जारी केली आहे.

गेले काही दिवस सुरु असलेला संततधार पाऊस आणि त्यामुळे मुंबई विभागात अनेक ठिकाणी विस्कळीत झालेले जनजीवन लक्षात घेऊन, सदर अर्ज भरण्याची विहित मुदत 27 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.खालील जिल्ह्यांमध्ये व्यवसायाचे मुख्य ठिकाण असलेल्या नोंदणीकृत करदात्यांसाठी सदर सुविधा देण्यात आली आहे:

मुंबई शहर /मुंबई /उपनगर/ ठाणे /रायगड/पालघरउपरोल्लेखित जिल्ह्यांतील करदात्यांना या मुदतवाढीचा लाभ घेण्याच्या तसेच विलंब शुल्क आणि दंड टाळण्यासाठी विस्तारित देय तारखेच्या आत विवरणपत्र दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.(दिनांक 20.08.2025 रोजी जारी सीबीआयसी अधिसूचना क्र. 12/2025 – केंद्रीय कर येथे पहा)

000000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीची चळवळ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा जपण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

जागतिक वसुंधरा दिनाला ५६ वर्षे पूर्ण होत असल्याने ५६ लाख वृक्षांचे रोपण ही मोहिम राबविली जाणार

लघुलेखन परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगवान वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस