vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

१० मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

१० मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

      सातारा, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाच्या अनुषंगाने जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा, तसेच कराड, पाटण, फलटण, कोरेगांव, खंडाळा, वडूज, वाई, दहिवडी, म्हसवड, महाबळेवर,मेढा येथील तालुका न्यायालयांमध्ये १० मे २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

 या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ परिकाम्य लेख अधिनियमाची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुबिक प्रकरणे, मोटार अपघात दावा प्रकरणे आदी प्रकरणे अदालतीसमोर ठेवण्यात आली आहेत. यात न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित तसेच वाद दाखल पूर्व प्रकरण दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी १० मे २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीसमोर मोठ्या प्रमाणात प्रकरणे ठेवून आपसी तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन सुरेखा कोसमकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायालय, सातारा यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

आदिवासी विद्यार्थ्यांनी नामांकित इंग्रजी शाळेत मोफत प्रवेशासाठी 25 मे पर्यंत अर्ज करावेत

सुशासनासाठी नागरिकांना सेवा संवेदनशील आणि गतिशीलतेने द्याव्यात- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर.

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्टच्या पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रीक बसगाड्यांचे लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे पाटील-श्रीगोंद्यात ‘बिबट रेस्क्यू सेंटर’ व वनविभागाच्या जागेवर विकास प्रकल्प उभारण्याच्या सूचना..

vishwatmaklokswamivarta

रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्यासाठी विधि व न्याय विभागाचे मार्गदर्शन घ्यावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

स्व. क्रांतिसिंहनाना पाटील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात* *- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर*