vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

अमरावतीत होणार आंतरराष्ट्रीय ‘एआय’ परिषद

अमरावतीत होणार आंतरराष्ट्रीय ‘एआय’ परिषद

 

     अमरावती, प्रतिनिधी): तंत्रज्ञानाच्या युगात मैलाचा दगड ठरणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित ‘ICAIISD-2025’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून संशोधन, नवोन्मेष आणि समाजविकासाचा जागतिक संवाद विदर्भाच्या मातीत घडणार आहे

     शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार असून, यासाठी देश-विदेशातील नामवंत शास्त्रज्ञ आणि उद्योजकांची मांदियाळी जमणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सचिन मांडवगणे तर प्रमुख अतिथी म्हणून बंगळुरू येथील ‘आयआयएसी’चे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. फणिंद्र कुमार यलवर्थी मार्गदर्शन करतील. याशिवाय, न्यूरोसिनॅप्टिकचे समीर सावरकर, सी-कॅम्पचे डॉ. निरंजन जोशी आणि डॉ. रविंद्र केसकर यांसारख्या दिग्गजांची उपस्थिती परिषदेला लाभणार आहे.

या परिषदेत प्रामुख्याने शेती, आरोग्य, शिक्षण, स्मार्ट सिटी, सौर ऊर्जा आणि ग्रामीण विकास यांसारख्या १३ महत्त्वाच्या विषयांवर १३ संशोधन प्रबंध सादर केले जातील. या परिषदेचे शोधप्रबंध ‘स्प्रिंगर नेचर’ सारख्या जागतिक स्तरावरील नामांकित प्रकाशनाद्वारे प्रसिद्ध केले जाणार आहेत.

   विदर्भातील विद्यार्थी आणि संशोधकांना जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांशी थेट संवाद साधता यावा आणि स्थानिक प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तरे शोधता यावीत, हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. टाटा मोटर्स आणि टीसीएस सारख्या उद्योगांचे सहकार्य लाभलेली ही परिषद तंत्रज्ञान क्षेत्राला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

00000

संबंधित पोस्ट

बाळासाहेब तनपुरे यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश 

नवी मुंबई शहर आता ‘रिसायकल हब’ – पर्यावरणशीलता जपणुकीसाठी पुनर्वापरातून पुढाकार

लोकाभिमुख सामाजिक संस्थाचा आधारस्तंभ हरपला लोकमान्य टिळक यांचे पणतू, केसरीचे विश्वस्त डॉ. दीपक टिळक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजलीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण केली

नाशिक येथे महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अशोक खरातचे  निकटवर्तीय जितेंद्र शेळकें यांच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही

vishwatmaklokswamivarta

महापौर कार्यालय-लोकमान्य सावरकरनगर प्रभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात – महापौर शर्मिला पिंपळोलकर

दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार, सुमारे ४३ लाख रोजगारनिर्मिती – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta