vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची प्रारुप यादी प्रसिद्ध; लिंकवर मतदारांना शोधता येणार आपले नाव

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची प्रारुप यादी प्रसिद्ध; लिंकवर मतदारांना शोधता येणार आपले नाव

      अमरावती, प्रतिनिधी: भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक विधानपरिषद मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार, दि. 3 डिसेंबर 2025 रोजी शिक्षक मतदार संघाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदारांना आता घरबसल्या आपले नाव ऑनलाइन शोधता येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालय आणि विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे

     दि 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन नाव शोधण्यासाठी अधिकृत लिंक शिक्षक मतदारांच्या सुविधेसाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी संकेतस्थळ https://ceoelection.maharashtra.gov.in/ConstituencyRolls/TandGElectoralRollsSimple.aspx उपलब्ध करून दिले आहे.

    अमरावती विभागातील सर्व पात्र शिक्षकांनी या प्रारुप यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करावी. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन उप-जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 

000

संबंधित पोस्ट

सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ-उपमुख्यमंत्री अजित पवारसांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॅलो डायबिटीज आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन..

महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात जनगणना २०२७ ची तयारी पूर्णत्वाकडे; १६ मेपासून घर सूचीकरण मोहिमेला सुरुवात

भारतीय हवामान खात्याच्या  जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध.

vishwatmaklokswamivarta