vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॅलो डायबिटीज आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन..

आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॅलो डायबिटीज आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन..

नागपूर, प्रतिनिधी : पारंपारिक जीवनशैलीतून विकसित झालेल्या आहारविषयक सवयींमध्ये शहरीकरणामुळे अनुचित बदल झाले आहेत. त्याचा दुष्परिणाम म्हणून कमी वयात विविध आजार बळावत आहेत. आदर्श जीवनशैलीचा स्वीकार करून मधुमेहापासून दूर राहता येणे शक्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.डायबिटीज केअर अँड रिसर्च सेंटर व डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हॅलो डायबिटीज’ या बाराव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन हॉटेल सेंटर पॉइंट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता, डॉ. रती मकर, पद्मश्री डॉ. शशांक जोशी, पद्मश्री डॉ. कमलाकर त्रिपाठी, डॉ. ए.के. दास, डॉ. बन्शी साबू, डॉ. विंकी रुघवानी, डॉ.कविता गुप्ता, चिकित्सक, तज्ज्ञ व वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक यावेळी उपस्थित होते.

भारतात मोठ्या प्रमाणात पसरत जाणारा मधुमेह आणि ओबेसिटी ही गंभीर व चिंतेची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, भारत ही मधुमेहाची राजधानी होऊ नये यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अशा जनजागृतीपर परिषदांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मुव्हमेंट या सारखे विविध उपक्रम हाती घेतले असून यातून आरोग्य विषयक जनजागृतीला प्राधान्य दिले जात आहे.

मधुमेह या आजारावर अधिक सखोल संशोधन होणे ही काळाची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, या परिषदेच्या माध्यमातून मधुमेह जडण्याची कारणे, उपाय व आदर्श जीवनशैली या विषयांवर जनजागृती होणे गरजेचे आहे. मनुष्याच्या शारीरिक क्षमता क्षीण करणाऱ्या या आजारावर जनजागृती हाच प्रथम व प्रभावी उपचार आहे. गरोदर स्त्रियांना व त्यातून पुढे नवजात बालकांना होणारा मधुमेह रोखण्याचे आव्हान तज्ज्ञांसमोर आहे. या परिषदेच्या माध्यमातून सकारात्मक निष्कर्ष प्राप्त झाल्यास येणारी पिढी निश्चितच मधुमेहमुक्त राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

डायबिटीस हा आजार झालेला असतानाही तो न स्वीकारण्याची मानसिकता असणे ही आपल्या येथील सर्वात मोठी समस्या आहे. यासाठी या आजाराची भीती न बाळगता औषधोपचार करण्यासोबतच जीवनशैलीत सुधार आणण्याबाबत योग्य मार्गदर्शन या परिषदांमधून होणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या परिषदेतील डायबिटीस आजाराविषयीचे देशभरातील तज्ज्ञ व चिकित्सकांचे विचारमंथन या संदर्भातील उपचारांसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 मधुमेह रोखण्यासाठी डॉ. सुनील गुप्ता सातत्याने जनजागृती करत असून त्यांनी यासाठी आतापर्यंत असंख्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विविध माध्यमातून ते संशोधन प्रसिद्ध करत आहेत. हे कार्य त्यांनी

संबंधित पोस्ट

राज्यात जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, मुंबईसह  उपनगरात पहाटेपासून मुसळधार पाऊस

ज्या महाराष्ट्रात थोडा जरी आरोप झाला तरी मंत्रीपदाचा राजीनामा घेतलाvजायचा आज त्याच महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही राजीनामा घेतला जात नाही ही सत्ताधार्‍यांची हतबलता :-जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

गुन्हेगारांविरोधात जलद कारवाईसाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी विभागीय कामाचे रँकीग नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक

ज्येष्ठ नागरिकांना माहिती, मदत आणि तक्रारींसाठी 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश**धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव व नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध*