vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रस्त्याचे काम अर्धवट; गणेश वाडेकर ठेकेदाराने बिलही उचलले माजी सरपंच विमल सातपुते यांच्या कार्यकाळात २०२३ ला झालेला रस्ता फक्त १० तास जेसीबी चालवून अर्धवट काम करुन ८ लाखाचे बोगस बिल उचलले तरीही यावर कारवाई होईल का?हस्ते पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गाठले थेट मिनी मंत्रालय.

रस्त्याचे काम अर्धवट; गणेश वाडेकर ठेकेदाराने बिलही उचलले माजी सरपंच विमल सातपुते यांच्या कार्यकाळात २०२३ ला झालेला रस्ता फक्त १० तास जेसीबी चालवून अर्धवट काम करुन ८ लाखाचे बोगस बिल उचलले तरीही यावर कारवाई होईल का?हस्ते पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गाठले थेट मिनी मंत्रालय.

जालना प्रतिनिधी-गावातील रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदारांने पूर्ण कामाचे बिल उचलून घेतल्याचा प्रकार जालना तालुक्यातील हस्ते पिंपळगाव येथे उघडकीस आला असून रस्त्याचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी ( दि. ६) थेट जिल्हा परिषद कचेरी काढून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर रस्त्याअभावी होणारी कैफियत मांडली.

 जालना तालुक्यातील हस्ते पिंपळगाव येथे जालना जिल्हा परिषद अंतर्गत सुधारणा मंजुरीतून हस्ते पिंपळगाव ते शेवगा रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम अर्धवट सोडून पूर्ण काम केल्याचे बिल उचलले असल्याची तक्रार केशव अंबादास शिंदे व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. २६ मे २०२३ रोजी तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी अर्धवट कामाचा पंचनामा केला. रस्ता अर्धवट व नाली बांधकाम न झाल्याने ग्रामस्थांना येण्या- जाण्यासाठी त्रास होत असल्याची तक्रार घेऊन केशव शिंदे, गजानन नानोटे यांच्या नेतृत्वाखाली महिला- पुरूष मंडळींनी शुक्रवारी ( दि. ६) थेट जिल्हा परिषद कचेरी गाठली. मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार हे परगावी असल्याने या ग्रामस्थांनी उपलब्धप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांची भेट घेऊन त्यांच्या समोर रस्त्याची कैफियत मांडली. तुबाकले यांनी हे प्रकरण तातडीने बांधकाम विभागाकडे चौकशीसाठी पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांनी निवेदन सादर करून अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करा, अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात कारवाई करावी, नसता ९ जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे.

     यावेळी ग्रामस्थ वामन किटाळे,बाबासाहेब किटाळे, मुक्ताबाई नानोटे, शोभा शिंदे, मदन नानोटे, सविता किटाळे, गंगुबाई किटाळे, लीलाबाई भांदरगे,सुमन वाघमारे, रंजना किटाळे, राजू नानोटे, विठ्ठल किटाळे, सुधाकर वाघमारे, मोहन वाघमारे, अंकुश किटाळे, मधुकर वाघमारे आदींची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची तीव्र प्रतिक्रिया; अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी तात्काळ पुढाकार,उपसभापती कार्यालयात अर्पण करण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली

रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक**आजअखेर 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्रे दाखल ; मंगळवारी छाननी

नसरापूर प्रकरणात न्यायाचा विजय-आरोपीला फाशीची शिक्षा,बालहक्क संरक्षण आयोगाकडून निर्णयाचे स्वागत!सबळ पुरावे, जलद तपास आणि प्रभावी न्यायालयीन मांडणीमुळे ऐतिहासिक निकाल.बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा कठोर इशारा : डॉ. संजय लाखेपाटील

64 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाच्या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

खुनाच्या गुन्ह्रात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक

vishwatmaklokswamivarta