vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलढाण्यात जिल्हास्तर युवा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलढाण्यात जिल्हास्तर युवा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजन समिती, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सव जिल्हा क्रीडा संकुल, जांभरुन रोड, बुलढाणा येथे उत्साहात पार पडला. विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील युवकांनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.

महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन दि. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम लोकनृत्य, लोकगीत, कथालेखन, काव्यलेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान मेळावा आदींचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवातील विजेते स्पर्धक अमरावती विभागीय युवा महोत्सवात बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय बिराजदार, सेवानिवृत्त कर्मचारी अजयसिंह राजपूत, जिल्हा युवा अधिकारी उपस्थित होते.

अमोल गायकवाड यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा संदर्भ देत युवकांमध्ये संयम, तळमळ, तेज, आदर, देशप्रेम आणि नशापासून दूर राहण्याचे गुण असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी मोबाईल आणि मादक पदार्थांपासून दूर राहून देश, समाज आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

अजयसिंह राजपूत यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा लाभ घेऊन सर्व स्पर्धकांनी आपली कला सादर करण्याचे आवाहन केले. तर दत्तात्रय बिराजदार यांनी प्रत्येक स्पर्धा ही जीवनाचा भाग असल्याचे सांगत युवकांना उत्कृष्टतेसाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला.

प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले. त्यांनी युवा महोत्सवाचा उद्देश स्पष्ट करताना युवकांना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे आणि बुलढाणा जिल्ह्याचे नाव विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी परीक्षक म्हणून टिळक क्षिरसागर, गजानन लोहटे, वैभव वाघमारे, डॉ. सुभाष चिंचोले, डॉ. सिध्देश्वर नवलाखे, डॉ. मनिषा राऊत, डॉ. संगिता पवार, वैशाली तायडे, एकनाथ इंगळे, विक्रम धावंजेवार, अमर चिंतळे, धनंजय महितकर, सुभाष देशमुख आदींनी कार्य केले.

कार्यक्रमाचे संचलन गजेंद्रसिंह राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन रविंद्र धारपवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्वला लांडगे, मनोज श्रीवास, विनोद गायकवाड, भिमराव पवार, सुहास राऊत आदींनी विशेष परिश्रम घेतले

संबंधित पोस्ट

नंदुरबारमध्ये अयोग्य दर्जाचे खाद्यतेल प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येणार-मंत्री नरहरी झिरवाळ

ग्रामस्थांच्या दायित्वातून मिळत आहे अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जनजीवन विस्कळीत झालेल्या मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली

vishwatmaklokswamivarta

सर्व शाळांमध्ये मराठी भाषा आणि राज्यगीत अनिवार्य

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्याला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या तळेरे–करूळ घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरूसिंधुदुर्ग जिल्ह्याला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या तळेरे–करूळ घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू

vishwatmaklokswamivarta

नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच