vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लोकशाही प्रजासत्ताक बनविण्याचा आणि मागास समाज घटकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ” विकास स्वराज पार्टी ” कटिबद्ध..

लोकशाही प्रजासत्ताक बनविण्याचा आणि मागास समाज घटकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ” विकास स्वराज पार्टी ” कटिबद्ध..

 

मुंबई : प्रतिनिधी- भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक बनविण्याचा आणि मागास समाज घटकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ” विकास स्वराज पार्टी ” कटिबद्ध राहील. सरकारने जर आमच्या पार्टीच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कृषिविषयक, सांस्कृतिक, राजकीय, संदर्भातील मागण्या मान्य केल्या नाही तर १५ जून रोजी आंदोलन करून समाजाला न्याय मिळवून देऊ असा इशारा पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष रितेश सालेकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

छत्रपति शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा प्रमाण मानून आमचा पक्ष आपली वाटचल करील असे उपाध्यक्ष वेदप्रकाश मिश्र यांनी सांगितले. तर महाराष्ट्र सरचिटणीस आनंद शेरावत म्हणाले, सामाजिक आणि आर्थिक बदलाद्वारे दुर्बल घटकांचे शोषण आणि वंचितांवरील दडपशाही संपवण्याची चळवळ आपला पक्ष करील. पार्टीचे सल्लागार पराग मानेक म्हणाले, वाढती, गुन्हेगारी, वाढता भ्रष्टाचार, याला आळा बसण्याऐवजी तो फोफावत चालला आहे तो रोखण्यासाठी वेळोवेळी सनदशीर मार्गाने आंदोलनाद्वारे त्यास विरोध केला जाईल.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झोपडी धारकांना ५००चौ. फु.चे घर देण्यात यावे. ८०० फुटापर्यंत घराला मालमत्ता कर माफ करावा.

मुंबईमध्ये अनेकवर्षे रखडलेले एसआरए प्रकल्प सरकारने स्वतः हाती घेऊन रहिवाशांना न्याय द्यावा. मुंबईती अतिक्रमणे हटवावीत. ट्रॅफिक च्या समस्यांपासून जनतेला मुक्ती मिळावी. युवकांना २० लाखांपर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे. ज्येष्ठ नागरिकांना प्रति महिना १० हजार रूपये सन्मान वेतन देण्यात यावे. सामान्य नागरिकाला जलद न्याय मिळवा यासाठी न्यायालयांची संख्या वाढवावी. ड्रग्जचा वापर वाढत असून तरूण पिढीला ड्रग्जच्या या विळख्यापासून वाचवण्यासाठी ठोस पावले उचलावीत. या मागण्या पार्टीने केल्या आहेत.

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात ‘Door Step Delivery’ उपक्रमांतर्गत ४ हजार ७४० नागरिकांना घरपोच दाखले देण्यात यश

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील कुर्ला परिसरातील एका हॉटेलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

vishwatmaklokswamivarta

जनगणना २०२७ प्रशिक्षण जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

मौजे सिरसवाडी येथील असंख्य युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…

संसदीय राजभाषा समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट,यानंतर मराठी पत्रव्यवहाराला मराठीतून उत्तर

शिवनगर येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर; १५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागरक्तदान हेच जीवनदानचा संदेश; सेवा व समर्पणातून मानवतेचा जागर