vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

*जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

 

सातारा प्रतिनिधी: सातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी शासन व प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जिल्ह्यात रेव पार्टी होणार नाही याची दक्षता घेऊन पोलीस विभागाने जिल्ह्यातील चेक पोस्टवर वाहनांची तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नार्को कोऑर्डीनेशन सेंटर समितीच बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबनीस, राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहायक आयुक्त योगेश शिंदे, अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक व्ही.व्ही. पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

काही औषधांचा वापर नशेसाठी केला जातो, अशी औषधे कोणत्या भागात जास्त विकली जात आहेत याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, याबाबत सविस्तर माहिती सादर करावी. अवैध्यरित्या गांजा व अफूची शेती होणार नाही याची पोलीस विभागाने खबरदारी घ्यावी. तसेच अंमली पदार्थांमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी.

 जिल्ह्यातील मोठे हॉटेल, लॉज यांची पोलीस विभागाने वेळोवेळी तपासणी करावी व अंमली पदार्थ आढळल्यास त्वरीत गुन्हे दाखल करावे. अंमली पदार्थांची विक्री होणाऱ्या ठिकाणी अचानक धाडी टाकाव्यात, जास्तीत जास्त गुन्हे दाखल करावेत. पोलीस विभागाने ड्रग पडकल्यानंतर त्याच्या तपासणीसाठी यंत्रसामुग्री जिल्हा वार्षिक योजनेतून खरेदी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत दिले.

0000

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासह अत्याधुनिक सुविधा देण्यास कटिबद्ध – मंत्री प्रकाश आबिटकर

खाणीतील कामगारांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अनुदान

सांस्कृतिक कार्यक्रमांनी महिला गौरव सप्ताहाची सांगता-सकारात्मकता निर्माण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांद्वारे अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – रुपाली चाकणकर जनसुनावणीत महिलांच्या ६८ तक्रारींवर कार्यवाही

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठीvनागरिकांना प्रोत्साहित करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदनाद्वारे आवाहन

महापारेषणला पॉवर ट्रान्समिशन पुरस्कार प्रदान अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta