vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जालना- प्रतिनिधी-

व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांच्या मार्गदर्शनाखाली व साप्ताहिक विंगचे जिल्हा अध्यक्ष सुयोग खर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारिणी नुकतीच येथील हॉटेल मधुबनच्या सभागृहात घोषित करण्यात आली.

यावेळी चर्चा करून सर्वानुमते असे ठरले की, व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या साप्ताहिक कार्यकारणीमध्ये सचिव पदासाठी जालना आंदोलनचे संपादक शब्बीर पठाण यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा संघटकपदी अनुक्रमे साप्ताहिक श्लोक टाइम्सचे संपादक अमित आनंद, साप्ताहिक परिवर्तन दर्पणचे विकास काळे, साप्ताहिक जलसम्राट चे उपसंपादक सचिन सर्वे, तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी भ्रष्टाचार विरोधी लोकाधिकारचे संपादक सय्यद अफसर यांची नियुक्ती करण्यात आली. तर जिल्हा कार्यकारणी सदस्यामध्ये देवचंद सावरे, युवराज कुरील, गोपाल गोमतीवाले, शिवाजी बावणे, विजय जाधव, नटवर किल्लेदार, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा व्हाईस ऑफ मिडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी आणि जिल्हाध्यक्ष सुयोग खर्डेकर यांच्यावतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष श्री. विकासकुमार बागडी, जिल्हाध्यक्ष श्री. सुयोग खर्डेकर, सय्यद अफसर, शब्बीर पठाण, गोपाल गोमतीवाले, देवचंद सावरे, युवराज कुरिल, सचिन सर्वे यांची उपस्थिती होती.

—————

संबंधित पोस्ट

नांदेड शहरात 15 व 16 जानेवारीला भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

जागतिक काविळ दिनानिमित्त रॅली उत्साहात साजरी

जिल्हा नियोजन समिती बैठक लोकसंख्येची वाढ गृहित धरुन नियोजन करावे- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सर्व स्तरावर व्यापक जनजागृती करावी  – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित तेवीस जिल्ह्यातील ३३ लाखापेक्षा जास्त्‍ शेतकऱ्यांना ३ हजार २५८ कोटीची मदत वितरणास मान्यता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील• मागील सात दिवसात सुमारे पाच हजार कोटींवर मदत• यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सात हजार ५०० कोटीची मदत…

vishwatmaklokswamivarta

बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रमप्रभावीपणे राबवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी