vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक काविळ दिनानिमित्त रॅली उत्साहात साजरी

जागतिक काविळ दिनानिमित्त रॅली उत्साहात साजरी

      जालना प्रतिनिधी:- जागतिक काविळ दिनानिमित्त आरोग्य विभाग जालनाच्या वतीने सोमवार दि. 28 जुलै 2025 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरातील नूतन वसाहत येथून रॅलीला सुरुवात करुन जिल्हा रुग्णालय जालना येथे समारोप करण्यात आला. यावेळी काविळ आजाराबद्दल जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, या रॅलीमध्ये परिचर्या प्रशिक्षण केंद्राचे सर्व विद्यार्थी तसेच ऑक्सफर्ड हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

 याप्रसंगी जालना रोटरी क्लब ऑफ सेंट्रल व सनराईज शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट जालना यांच्या सौजन्याने रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र गाडेकर , सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन मस्के, निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉ. शितल सोनी ,काविळ नियंत्रण कार्यक्रम प्रमुख डॉ.प्रशांत बादल, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. राजेंद्र शेजुळे, सनराईज रेस्टॉरंटचे मोहन इंगळे, रोटरी क्लब सेंट्रलचे डॉ. आशुतोष सोनी, सचिव सचिन लोहिया, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी दादाराव बोराडे, आर बी एस के समन्वयक विद्या मस्के, औषध निर्माण अधिकारी मनिष जाधव प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप लुखे, संतोष इंगळे , सोनाजी भुतेकर, अमोल पेरकर, विजय पवार, प्रदीप वाघ, जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे सर्व कर्मचारी परिचर्या केंद्राचे सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

कै. श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’सोबत सामंजस्य करार

अतिदुर्गम भागात पोषण आहार व प्राथमिक आरोग्य सेवा३८ नवीन अंगणवाड्यांच्या माध्यमातून देणार- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी व्यापार क्षेत्राचा समग्र विकास आवश्यक -राज्यपाल सी पी राधाकृष्णन-राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सागरी सप्ताहाचे उद्घाटन…

राज्यातील १५ जिल्ह्यांतील ६३३ गावे,१६५२ वाड्यांमध्ये ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जलयुक्त, समृद्ध महाराष्ट्र’ संकल्पनेला बुलढाण्यात बळ;टाटा ट्रस्ट-मानवलोकच्या उपक्रमातून शाश्वत शेतीला चालना..