vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

रुग्ण व नातेवाईकांसाठी वॉटर फिल्टर विथ कुलरचे दान

रुग्ण व नातेवाईकांसाठी वॉटर फिल्टर विथ कुलरचे दान

नांदेड प्रतिनिधी : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छ व आरोग्यदायी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने वॉटर फिल्टर विथ कुलर दान करण्यात आला आहे.

भीषण उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रुग्ण व नातेवाईकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हॅपी क्लब व नांदेड शांतता कमिटी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. ॲड. मोहम्मद कासिम वसीम बाबुसेठ तसेच हॅपी क्लबचे अध्यक्ष मोहम्मद शोहेब यांच्या सहकार्याने बालरोग विभागातील वॉर्ड क्रमांक ७ साठी हा वॉटर फिल्टर विथ कुलर रुग्णालयास प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, बालरोग विभागप्रमुख डॉ. किशोर राठोड, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद देवसरकर, अधिसेविका बी. आर. मुदीराज यांच्यासह कर्मचारी व रुग्णनातेवाईक उपस्थित होते.

यावेळी अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी समाजातील दाते, सामाजिक संस्था आणि सुजाण नागरिकांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून रुग्णालयाला रुग्णोपयोगी साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना थेट लाभ मिळत असून अधिकाधिक दाते पुढे येऊन आरोग्यसेवेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

देण्यात आलेल्या साहित्याची योग्य देखभाल व व्यवस्थापन करण्याच्या सूचनाही संबंधित वॉर्डाला देण्यात आल्या. तसेच रुग्ण व नातेवाईकांनी उपलब्ध सुविधांचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमासाठी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने राजरत्न केळकर व कुणाल महागडे (समाजसेवा अधीक्षक) यांनी संस्थेशी समन्वय साधून अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर फिल्टर उपलब्ध करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. रुग्णालय प्रशासनाने दात्यांचे आभार भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

००००००

संबंधित पोस्ट

हत्तीरोग दुरीकरणासाठी भिवंडी तालुक्यात १० फेब्रुवारीपासून सार्वत्रिक औषधोपचार मोहीम… भिवंडी तालुक्यात हत्तीरोग निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ : जनजागृतीसाठी मोबाईल आरोग्य व्हॅनला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा सामान्य रुग्णालयात रांगोळी व पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

मानसिक शांतता, आरोग्यवर्धनासाठी संगीत प्रभावी माध्यम- डॉ. संतोष बोराडे

चिमुकलीचा जीव वाचविला नाही तर जग माफ करणार नाही’- डॉ. सुधा कांकरिया लिंगगुणोत्तर कमी असलेल्या १६ गावांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न.

शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ बाबत आयोजित बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्रीरंग नायक तसेच मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी