vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील मेट्रो मार्ग-2 व 7 प्रकल्पांकरिता वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास मुदतवाढ…

मुंबईतील मेट्रो मार्ग-2 व 7 प्रकल्पांकरिता वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास मुदतवाढ…

 

           मुंबई प्रतिनिधी- मुंबईतील मेट्रो मार्ग-2अ (दहिसर पूर्व ते डी.एन.नगर), 2ब (डी.एन.नगर ते मंडाळे) आणि मेट्रो मार्ग-7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

            एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून मेट्रो मार्ग-2अ (दहिसर पूर्व ते डी.एन.नगर), 2ब (डी.एन.नगर ते मंडाळे) आणि मेट्रो मार्ग-7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) करिता एकूण 1075.74 मिलीयन डॉलर कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी 549.25 मिलीयन डॉलर म्हणजेच 4 हजार 304 कोटी 43 लाख रूपये खर्च झाला आहे. या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने कर्ज उचल करण्यास 30 जून, 2025 पर्यंत मुदत दिली होती. या प्रकल्पातील मेट्रो मार्ग-2अ आणि 7 कार्यान्वित झाले आहेत. मेट्रो प्रकल्प 2ब चे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पात एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या कर्जाद्वारे 96 मेट्रो ट्रेन घेण्यात येणार होत्या. त्यापैकी 60 मेट्रो ट्रेन प्राप्त झाल्या आहेत. या कर्जास 31 डिसेंबर, 2026 पर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे उर्वरित 36 मेट्रो ट्रेन उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत.

००००

संबंधित पोस्ट

गुरुवारी ठाण्यातील काही भागात 24 तास पाणी नाही

ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन· राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध मान्यवरआणि चाहत्यांनी घेतले अखेरचे दर्शन

जालना जिल्ह्यात १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,- मराठा समाजाच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक, उपोषण मागे घेण्याचे आवाहन- प्राप्त अर्जांपैकी ९९.९ टक्के अर्ज मंजूर; एकही अर्ज प्रलंबित नाही- महसूल मंडळनिहाय विशेष शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन- अंतरवाली सराटीच्या विकासावर लक्ष देणार

vishwatmaklokswamivarta

अंबडमधील बालिकेवरील अत्याचार प्रकरणात आयोग आक्रमक; जिल्हा प्रशासनाला तातडीचा इशारा,अटक न झाल्याने संताप; पीडित कुटुंबाच्या आंदोलनाची दखल, आजच अहवाल सादर करण्याचे आदेश

शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथे ११ ऑगस्टला अतिरिक्त प्रवेश फेरी

म्हसळा तालुक्यात जमिनीच्या ‘पोटहिस्सा’ मोजणीचा पथदर्शी प्रकल्प**अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होणार अचूक मोजमाप*