vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित.

राज्य प्रतिनिधी- जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी गावपातळीवर समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आज शासन निर्णय क्र. सीबीसी-२०२५/प्र.क्र. १२९/मावक दिनांक ०२ सप्टेंबर २०२५ निर्गमित केला आहे.

गावपातळीवर गठीत समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहायक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल. मराठा समाजातील भुधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दि. १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचे वास्तव्य दाखविणारे प्रतिज्ञापत्र सादर करावे. तसेच, त्यांच्या कुळातील किंवा नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व त्यांनी अर्जदारासंबंधी प्रतिज्ञापत्र दिल्यास, स्थानिक समिती आवश्यक चौकशी करून अहवाल सादर करेल. सक्षम प्राधिकारी या चौकशीच्या आधारे अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतील. याबाबत कार्यपध्दती करण्यात आलेला शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे.

०००

संबंधित पोस्ट

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समन्वयातून सोडविणार – मंत्री मकरंद जाधव-पाटील

बांधकामे, गार्डन, स्टेडियम, इन्स्टिट्युट येथे प्रक्रियाकृत पाण्याचाच वापर करावा – नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना; विस्तारीत टप्पा-2 व 3 मध्ये जिल्ह्यातील 16 हजार 177 लाभार्थ्यांची जोडणी*

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta

ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ सुप्रमासाठी प्रस्ताव सादर करावा- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातूनयंत्रणांनी शाश्वत ग्रामविकास साधावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे, अभियानाच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना

vishwatmaklokswamivarta