vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या पार्श्वभूमीवर ‘ध्वनी चित्र रंजन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन..

गडचिरोली प्रतिनिधी: जागतिक स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट २०२५ या उपक्रमाच्या अनुषंगाने, महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘ध्वनी चित्र रंजन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील सेमाना हॉल, चामोर्शी रोड येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा, मनोरंजन व जाहिरात क्षेत्रातील महाराष्ट्राचे योगदान, महाराष्ट्र गीतांची मेडली, स्थानिक वाद्यांची जुगलबंदी, नाट्यगीते, चित्रपट गीत आणि लोकधारा अशा बहुरंगी सादरीकरणांनी रसिकांची मनं जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या वेळी शुक्ला महाराज व प्रदीप यमनूरवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या विशेष उपक्रमाची संकल्पना ॲड. आशिष शेलार (सांस्कृतिक कार्य तसेच माहिती व तंत्रज्ञान मंत्री) यांची असून, या कार्यक्रमाला श्री. विकास खारगे (मुख्यमंत्रीांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव) यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन श्री. विभीषण चवरे (संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय) यांनी केले.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण महाबळेश्वर येथे २ ते ४ मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन…

नगररचना विभागाने 2025-26 आर्थिक वर्षात जमा केला 541.84 कोटी रक्कमेचा विक्रमी महसूल…

टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये मुंबई तील ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे निर्जलीकरण प्रशिक्षण…

महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जाबाबत समाज कल्याणच्या सूचना-शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाडीबीटी व्हर्जन 2.00 कार्यान्वित

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय शालेय(मुले) फुटबॉल लिग स्पर्धा; 10 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित