vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील महापालिका व नगरपालिकांमध्ये उद्या स्वच्छता मोहीम‘महाश्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रम राबवणार स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत २० हजार ठिकाणांची स्वच्छता होणार

राज्यातील महापालिका व नगरपालिकांमध्ये  स्वच्छता मोहीम‘महाश्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रम राबवणार स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत २० हजार ठिकाणांची स्वच्छता होणार

मुंबई, प्रतिनिधी : नगरविकास विभागाच्या वतीने राज्यात १७ सप्टेंबर २०२५ पासून ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२५’ सुरू असून याअंतर्गत राज्यातील अस्वच्छ असलेल्या सुमारे २० हजार ४४६ ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत २५ सप्टेंबर रोजी राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये ‘महाश्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

 

            राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशभर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता करून त्या ठिकाणांचे परिवर्तन करणे, सार्वजनिक जागांची स्वच्छता, सफाई मित्र सुरक्षा शिबिर, स्वच्छ हरित महोत्सव आणि स्वच्छता पुरस्कार या उपक्रमांचा समावेश आहे.

 

या अभियानाअंतर्गत गुरुवारी राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये ‘महाश्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमाअंतर्गत सकाळी ८.०० वा. लोकांच्या सहभागाने सामूहिक स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मेट्रो सिनेमा ते ईएनटी रुग्णालय मार्गावरील स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत.

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात राज्यातील २०,४४६ ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून आजपर्यंत त्यातील सुमारे ६,०८२ ठिकाणे स्वच्छ करण्यात आली आहेत. स्वच्छता अभियानात जनसहभागाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सफाई मित्रांसाठी ४०६ सुरक्षा शिबिरे घेण्यात येणार आहेत. तसेच २,१७३ ठिकाणी स्वच्छ हरित महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

जरंडेश्वर उपकेंद्रातून 33 केव्ही नेर उपसा सिंचन योजनेवरील वाहिनी आज होणार कार्यान्वित नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे‘समता सप्ताह’ सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते कल्याणकारी योजनांचे लाभार्थ्यांना वितरण…

विधानपरिषद कामकाज/ प्रश्नोत्तरे-उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित-सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले· जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई-विशेष मोहीमेमध्ये ३६ गुन्हयांसह ५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तरच मिळणारडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ !

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासा-कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन