vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सेलू, जिंतूर येथे नैसर्गिक आपत्तीचा घेतला आढावा नुकसानीचे जलदगतीने पंचनामे करण्याचे निर्देश; रस्ते दुरुस्ती, वीजपुरवठा सुरळीत करावा, आपत्ती टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सेलू, जिंतूर येथे नैसर्गिक आपत्तीचा घेतला आढावा ,नुकसानीचे जलदगतीने पंचनामे करण्याचे निर्देश; रस्ते दुरुस्ती, वीजपुरवठा सुरळीत करावा, आपत्ती टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे

परभणी, प्रतिनिधी : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज सेलू व जिंतूर येथे आयोजित बैठकीत नैसर्गिक आपत्तीचा सविस्तर आढावा घेऊन नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याबरोबरच रस्ते दुरुस्ती, वीजपुरवठा सुरळीत करावा, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सूचनाही त्यांनी केल्या.सेलू येथील आयोजित बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबंधित विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सेलु तालुक्यातील पिकांचे, शेतीचे, घराचे त्यासोबतच सार्वजनिक व्यवस्थेचे अतोनात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत पोहोचवण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रशासकीय पातळीवर कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता योग्य पद्धतीने सर्व नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यांनी पीक विमा संबंधित माहिती जाणून घेतली, त्यासोबतच रस्त्यांची लवकर दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले, अनेक भागात विस्कळीत झालेला वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यासाठी काम करण्याच्या सूचना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.

शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करून त्यांना लागणारी मदत उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकरी व नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी मी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जिंतूर येथील बैठकीत पालकमंत्री यांनी जिंतूर तालुक्यात झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेऊन शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शेतीमध्ये झालेल्या नुकसानीचे, दगावलेल्या जनावरांचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करावेत, रस्ते-पूल यांचे काम त्वरित सुरू करून व्यवस्था सुरळीत करावी, वीजपुरवठा पूर्ववत करावा या सूचना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या. त्यासोबतच पुढे येणाऱ्या आपत्ती टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसिलदार श्री.सरवदे यांच्यासह विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

००००

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांनी मानधन योजनेच्यालाभासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करावा- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे         

समृद्धी महामार्ग अपघात : आठ मृतांच्या कुटुंबीयांना ४० लाखांची मदत-मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी रुपये ५ लाख रूपये

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट

विविध मागण्यांसाठी दिव्यांगांची कलेक्टर कचेरीसमोर निदर्शने

मानवरत्नांच्या हस्ते श्री क्षेत्र कपिलधार येथील ३० व्या राज्यव्यापी मेळाव्यात पुरस्काराचे वितरण होणार”‘शिवा संघटनेचे २०२५ चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर’ … प्रा. मनोहर धोंडे

vishwatmaklokswamivarta

बुधवारी आंबा महोत्सव: प्रदर्शनी व विक्री