मानवरत्नांच्या हस्ते श्री क्षेत्र कपिलधार येथील ३० व्या राज्यव्यापी मेळाव्यात पुरस्काराचे वितरण होणार”‘शिवा संघटनेचे २०२५ चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर’ … प्रा. मनोहर धोंडे
मानवरत्नांच्या हस्ते श्री क्षेत्र कपिलधार येथील ३० व्या राज्यव्यापी मेळाव्यात पुरस्काराचे वितरण होणार”‘शिवा संघटनेचे २०२५ चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर’ … प्रा. मनोहर धोंडे
राज्य तिनिधी- शिवा- अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे दरवर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमे निमित्त श्रीक्षेत्र कपिलधार ता. जि.बीड येथे यात्रेमध्ये श्री मन्मथ स्वामींची समाधी शासकीय महापूजा व भव्य राज्यव्यापी महामेळावा आयोजित केला जातो. सन २००२ ला सुरु केलेले हे पुरस्कार सलग २५ वर्षापासुन आजपर्यंत श्री क्षेत्र कपीलधार येथे शिवा संघटनेच्या प्रथेप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार दिलेले आहेत. त्यामुळे यंदाही दि. ०५ नोव्हेबर २०२५ रोज बुधवारी दुपारी ठिक ४.०० वाजता ३० व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन केले असुन या मेळाव्याच्या निमित्ताने शिवा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील वीरशैव लिंगायत समाजाच्या मान्यवरांना ‘शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार’ जाहिर करुन, सन्मान चिन्ह व सन्मान पत्रासह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देवुन यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. देशातील वीरशैव लिंगायत समाजात अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या शिवा संघटनेच्या या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड ‘शिवा’ संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांनी नुकतीच जाहिर केली आहे. ते”विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवर व्यक्ती व शिवा च्या शाखा खालील प्रमाणे आहेत”वीरमठ संस्थानचे मठाधिपती आदरणीय गुरुवर्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना शिवा संघटनेच्या वतीने ‘राष्ट्रसंत’ ही पदवी देण्यात आलेली आहे. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना सोमवार दि. २३ एप्रिल २००७ रोजी शिवाजी पार्क मुंबई येथे शिवा संघटनेच्या ‘शिवा राष्ट्रभक्ती संस्करण जानजागृती अभियानाच्या’ समारोप समारंभानिमीत्त संपन्न झालेल्या शिवा संघटनेच्या ‘भव्य राज्यव्यापी अधिवेशनात’ राष्ट्रसंत ही पदवी’ देवुन २५००० कार्यकर्त्यांच्या साक्षीने राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. आर आर पाटील आणि शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या हस्ते अहमदपुरकर आप्पांना मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देवुन सन्मानीत करत राष्ट्रसंत ही पदवी अर्पण (बहाल) करण्यात आली आहे. तेव्हापासुन देशभर आदरणीय अहमदपुरकर आप्पांना पंतप्रधानांसह सर्वजन अत्यंत स्वाभीमानाने राष्ट्रसंत म्हणुन उल्लेखीत करत आहेत, याचा शिवा संघटनेला सार्थ अभिमान आहे
या पंरपरेप्रमाणेच वीरशैव-लिंगायत समाजातील व्यक्ती अनेक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांनाही देशपातळीवर सन्मानीत करण्यासाठी सन २००२ सालापासुन प्रतिवर्षी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थाना श्री क्षेत्र कपिलधार येथील शिवा संघटनेच्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्यात ‘शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार देण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे याही वर्षी खालील मान्यवरांना प्रतिष्ठेचे शिवा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत
शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार जाहीर मान्यवरांची यादी
१.शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ठ शिव कथाकार पुरस्कार,शि.भ.प कुमारसागर सांभय्या स्वामी, लोहारा जि. धाराशिव, मो. नं. ९१४५११८२०१
२.शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट शिव किर्तनकार पुरस्कार,शि.भ.प. जगन्नाथ पांडूरंग क्षिरसागर, मु. पो. देवळाली, ता. जि. धाराशिव, मो. नं. ९४२१५९७८३३ शि.भ.प. विश्वनाथ सदाशिव स्वामी पेनुरकर, मु. पो. पेनुर, ता. लोहा, जि. नांदेड, मो. नं. ९६३७२२९१२८
३ शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट गायक-वादक पुरस्कार,श्री मारोती शंकरअप्पा शिवशेट्टे, रा. जय भावानी नगर, प्लॉट नं. २५, वडगाव (को.), छत्रपती संभाजीनगर
श्री खंडेराव राधाकिसन बंडगर, मु. पो. शेवाळा, ता. देगलुर, जि. नांदेड, मो. नं. ९६३७४६२३९४श्री कपिल गजानन भालके (मृदगांचार), मु.पो. जामगा शिवनी, ता. लोहा, जि. नांदेड, मो. नं. ९११९५७५३५२
४.शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट अखंड शिवनाम सप्ताह कमिटी पुरस्कार अखंड शिवनाम सप्ताह कमिटी, चापोली, ता. चाकुर, जि. लातुर द्वारा:१. श्री रमाकांत शिवराज स्वामी, मो. नं. ९७६६७५४६९१२. श्री वसंत माणिकराव होनराव, मो. नं. ७२४९३५०३७४
शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट वीरशैव भजनी मंडळ पुरस्कार१.श्री गुरु तोटलिंग स्वामी, बाल भजनी मंडळ, कळमनूरी, जि. हिंगोली, द्वारा श्री ष. ब्र. प्र. १०८ सद्गुरु महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरीकर, मो. नं. ९०९६९७४५११
२.वीरशैव भजनी मंडळ, नागलगाव, ता. उदगीर, जि. लातुर द्वाराः १. श्री बसवराज ब्याळे, मो. नं. ९८५०६४०६०७२. श्रीमती उषाताई गोडबोले, मो. नं. ९५६१९४२८५३
शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट शिवा तालुका शाखा पुरस्कार,शिवा संघटना तालुका शाखा-बुलढाणा, द्वाराः श्री सुनिल विश्वनाथ बेलपत्रे, रामनगर बुलढाणा मो.९४२२९२६९०७,शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट शिवा -शहर शाखा पुरस्कार,शिवा संघटना शहर शाखा-लातुरद्वाराः १. श्री शिवहार बिराजदार, श.प्रमुख, मो. ८४२१२१९१११ २. श्री श्रीनिवास मेनकुदळे, संघटक, मो. ८६९८७९५५५३,शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट शिवा गावशाखा पुरस्कार१. शिवा संघटना गाव शाखा-सावरगाव, ता. लोहा, जि. नांदेड गाव शाखा पुरस्कार,द्वाराः १. श्री नवनाथ दगडगावे, मो. ९६६५०५९१५५२. श्री उमाकांत कारामुंगे, मो. ९८६०८१०५८६
२.शिवा संघटना गाव शाखा-वाजंरवाडा, ता. जळकोट, जि. लातुर द्वाराः १. श्री कपिल टाले, शाखा प्रमुख, मो. ९३५९०४०१२९ २. श्री राहुल शिवनगे, उप प्रमुख, मो. ९५४५०७४१४२३.शिवा संघटना गाव शाखा पानभोसी, ता. कंधार, जि. नांदेड द्वाराः १. श्री विश्वनाथ भोसीकर, मो. ९५४५६३८७०८२. श्री बाबुराव डोम, मो. ९९७०४०६८००३. श्री शेख बाबुसाब कासिमसाब मो. ९६३७४६९२७६
शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट शिवा सोशल मिडीया कार्यकर्ता पुरस्कार१.श्री दत्तात्रय प्रकाश पाटील, मु.पो. मंडगी, ता. देगलुर, जि. नांदेड, मो. नं. ८००७५७९०५७२.श्री जनार्दन प्रल्हादराव खाकरे, शिवशक्ती बिल्डींग, शिवराम नगर, वसमत रोड, परभणी, मो. नं. ८६२६०३४४९६
शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट शिवा कार्यकर्ता पुरस्कार
१ श्री सुरेशअप्पा मलिकार्जुनअप्पा घळे, मु. पो. सनगाव, ता. जि. वाशिम, मो. नं. ९७६७८८२४५१ / ९४२३८४६७६३
२. श्री विरोचन प्रल्हाद तोटकर, मु. पो. गुडसुर, ता. उदगीर, जि. लातुर, मो. ९०१११४१११५
११.शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार,श्री विश्वनाथ गोविंदराव होळगे, मु.पो. दापसेड, ता. लोहा, जि. नांदेड, मो. नं. ९७६४०२५२०
१२. शिवा राष्ट्रीय भुषण उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
१.श्री मोहम्मद सिकंदर मोहम्मद यूसूफ, रा. दर्गाहपुरा, कंधार, जि. नांदेड (प्रतिनीधी-हिंदवी बाणा न्युज चॅनल व दैनिक वतनवाला), मो. नं. ९९६०४३४६५९
२.एबीएन-४ आवाज बहुजनांचा न्यूज चॅनल, अहमदपुरद्वारा: श्री शिवाजीराव रामराव गायकवाड, (संपादक) मु.पो. गायकवाड कॉलनी, अहमदपुर, मो. नं. ७७०९०७०३५८
१३.शिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ट धार्मिक संस्था पुरस्कार
शिवा-स्वयंभू नंदिकेश्वर महादेव मंदिर व अनुभव मंडप चॅरीटेबल ट्रस्ट, तुकाई टेकडी, हडपसर, पुणे द्वाराः १. श्री रोहीदास संगप्पा बेलुरे, मो. नं. ८६००९७४१६० २. श्री किशनराव शामराव खडकउमरगे मो. ८५५०९०८७९
१४.शिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ट सेवाधारी:-संस्था पुरस्कार,ड्रीम फोंडेशन व महात्मा बसवेश्वर करीअर अॅकडमी, सोलापूर द्वाराः- काशीनाथ गुरुशांत भातगुणकी (संस्थापक), मु. पो. हत्तरसंग, ता. दक्षिण सोलापुर, जि. सोलापुर, मो. ९८९०९४८३८८ इत्यादी पुरस्कार शिवा संघटनेच्या वतीने घोषित करण्यात आले असुन शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार दि. ५ नोव्हेबर २०२५ रोज बुधवारी श्री क्षेत्र कपिलधार ता. जि. बीड येथे शिवा संघटनेच्या होणाऱ्या ३० व्या राज्यव्यापी वार्षीक मेळाव्यात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल-श्रीफळ देवून शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे व अनेक गुरुवर्य आणि पालकमंत्री तथा उप मुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार, मा. ना. पंकजाताई मुंडे, मा. ना. अतुल सावे, माजी मंत्री मा. आ. धनंजय भाऊ मुंडे, माजी विरोधी पक्ष नेते मा. आ. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.असे प्रदेश अध्यक्ष-शिवा संघटना महाराष्ट्र राज्य मनिष पंधाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिले आहे.