vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विविध मागण्यांसाठी दिव्यांगांची कलेक्टर कचेरीसमोर निदर्शने

विविध मागण्यांसाठी दिव्यांगांची कलेक्टर कचेरीसमोर निदर्शने

जालना- प्रतिनिधी आपल्या विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

 निदर्शनापूर्वी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने अंबड चौफुलीवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे, जिल्हाध्यक्ष राहूल मुळे, लक्ष्मीबाई भुतडा,मुन्नाभाऊ दायमा, सतीश फतपुरे यांनी केले

    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदार आर. के. मेंडके यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात

  आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात दिव्यांगांना सहा हजार मानधन सुरू करावे,जालना शहरातील मधुबन कॉलनी किंवा मस्तगड येथे दिव्यांगांसाठी पुनर्रवसन केंद्र सुरू करावे, ग्रामपंचायतीच्या धर्तीवर दिव्यांगांना नगर पंचायत, नगर परीषद, महानगर पालीकामधे नळप‌ट्टी, घरपट्टीमध्ये50 टक्के सूट देण्यात यावी, दिव्यांनी घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे, दिव्यांगांना दिव्यांग वित्त विकास महामंडळाकडुन विनाअट व विनाहमी १० लक्ष रूपये कर्ज देण्याची तरतुद करण्यात यावी, दिव्यांगांना उधारनिर्वाह करण्यासाठी ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद, महानगर पालिका यांनी शासन निर्णय नुसार 200 स्वेअर. फुट जागा उपलब्ध करून देण्यात यावी, दिव्यांगासाठी 2016 मधील कायद्याची देशभर कडकपणे अंमलबजावणी करण्यात यावी, दिव्यांगांसाठी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकिय रुरणालय, महानगर पालिका आदी शासकीय कार्यालयामध्ये स्वतंत्र खिडकी निर्माण करण्यात यावी,

म्हाडा काॅलनी येथील दिव्यांग सविता बोराडे यांच्या वरती सतत अन्याय होत असून याकडे तालुका पोलीस ठाणे दुर्लक्ष करत आहे तातडीने आरोपीला अटक करण्यात यावी दरवर्षी स्थानिक आमदार फंडातून निधीतुन दिव्यांगावर 30लक्ष खर्च करण्यात यावा,

 दिव्यांगाचा बचत गटांना 2 लाख अनुदान देण्याची तरतुद करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश असून सदरील मागण्याची त्वरीत दखल घेऊन त्या सोडविण्यात याव्यात नसता सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने शांततेच्या मार्गाने व लोकशाही पध्दतीने येत्या काही दिवसात संपुर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

    या निदर्शनसमयी जगदीश सातपुते, विठ्ठल चव्हाण, सुरेश बोराडे, सतीश वाघ, इंदुबाई अवसरमोल, ठकुबाई डोंगरे, रोशन अवसरमोल, कांताबाई आघाम,सागरबाई धोंगडे, गणेश खंदारे, नागेश अंबिलवादे, शहादेव कोल्हे, अनिल महापुरे,रेहान निसार शेख, शेख शफीकमिया, गोविंद चिखले, रुख्मिणी सपकाळ, सुनंदा भास्करे, बाळू आगलावे, विलास कांबळे, राजेश कावेटी,सुधाकर पवार, साबेर शेख, शेख इक्बाल, सुनिता खंदारे, नंदकिशोर चव्हाण, पुरूषोत्तम अडाणी, सुनिता लोळगे,भीमराव साळवे, नानाभाऊ सुरासे,अशोक कणके आदींची उपस्थिती होती.

चौकट-: जालन्यातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिला पाठींबा

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा जल्लोष आज ‘ श्री ‘ ची होणार प्राणप्रतिष्ठा स्वयंसहाय्यता गटांच्या हस्तकौशल्य दालनासह सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

पाणी हक्क समितीच्यावतीने ‘सर्वासाठी पाणी ‘अहवाल सादर…

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने वंदेमातरम् गीताची १५० वर्षपूर्ती साजरी वंदेमातरम् गीताचे वंदेमातरम् हे दोन शब्द ऐकताच राष्ट्रभक्ती जागृत होते – माजी आमदार कैलास गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

विकसीत भारत यंग लिडर डॉयलॉग क्विझ मध्ये युवक-युवतींसाठी ज्ञान, संधी आणि गौरवाचा मंच.

vishwatmaklokswamivarta

राज्यात भू-करमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती १ ते २४ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

वाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्न उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विविध मागण्या; शेतकरी महिलांना जमिनीच्या अधिकारासाठी शासन प्रयत्नशील..