vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुंबई ते गोवा रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) बोट सेवा सुरु करण्याची योजना आखत आहे. खुद्य मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभाग मंत्री नितेश राणे यांनी याबाबतची घोषणा केली. 

मुंबई ते गोवा रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) बोट सेवा सुरु करण्याची योजना आखत आहे. खुद्य मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभाग मंत्री नितेश राणे यांनी याबाबतची घोषणा केली.

राज्य प्रतिनिधी -कोकणात , मे महिना, गणेशोत्सव हे काही असे टप्पे जेव्हा महाराष्ट्रातील शहरी भागांमधून अनेकांचेच पाय खेड्यापाड्याकडे वळतात. त्यातही कोकणच्या दिशेनं जाणाऱ्यांचा आकडा तुलनेनं मोठा. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की त्याआधीच काही महिन्यांपूर्वी या सणासाठी रेल्वे आणि एसटीच्या तिकीटाच्या आरक्षण प्रक्रियेला सुरुवात होते. पण, प्रवाशांची वाढती संख्या पाहता जादा पर्याय उपलब्ध करून देऊनही अनेकदा काही प्रवाशांना मात्र निराशेचाच सामना करावा लागतो.

वरील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आता महाराष्ट्र शासनानं एत अतिशय कमाल उपाय अमलात आणण्याचा विचार केल्याचं स्पष्ट होत आहे. हा विचार म्हणजे मुंबई ते गोवा रो-रो बोट सेवा. कोकणात दरवर्षी गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. याचदरम्यान मुंबईसह ठाणे, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईतून अनेकजण कोकणत्या दिशेनं रवाना होतात. याच धर्तीवर प्रवाशांच्या अडचणी केंद्रस्थानी ठेवत मुंबई ते गोवा रो रो सेवेची आखणी करण्यात येत असून राज्य शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदर विभाग मुंबई ते गोवा रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) बोट सेवा सुरु करण्याची योजना आखत आहे. खुद्य मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभाग मंत्री नितेश राणे यांनी याबाबतची घोषणा केली.

प्रवासासाठी किती वेळ लागणार?

रो रो बोट सेवा उपलब्ध झाल्यास सागरी मार्गानं प्रवास करत असतानाही प्रवाशांना त्यांच्या स्वतःच्या वाहनांनी प्रवास करता येईल. या सेवेअंतर्गत प्रवाशांना मुंबईतील माझगाव डॉक इथं जहाजावर चढता येईल. जवळपास साडेचार तासांमध्ये या माध्यमातून कोकणातील सिंधुदुर्ग इथं असणाऱ्या देवगड किनाऱ्यावर प्रवाशांना उतरता येईल. फक्त कोकणापर्यंतच नव्हे तर प्रत्यक्षात ही सेवा गोव्यापर्यंत विस्तारेल आणि या गोव्यापर्यंतच्या प्रवासासाठी साधारण साडेसहा तासांचा वेळ लागेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सदर रो रो “या उपक्रमामुळे हजारो भाविकांना आवश्यक दिलासा मिळत गणेश चतुर्थी दरम्यान एकूण प्रवासाचा त्यांचा अनुभव सुधारेल,” असंही राणेंनी स्पष्ट केलं. तेव्हा आता या उपक्रमावर प्रत्यक्षात कधी काम सुरू होतं आणि यंदाच्या गणेशोत्सवात चाकरमान्यांना ही खास भेट देण्यात महाराष्ट्र शासन यशस्वी ठरतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित पोस्ट

मिशन अयोध्या’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी प्रख्यात महंत परम पुज्य श्री रामगिरी महाराज विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपये, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या -मंदिराला फक्त २५० रुपये?औरंगजेबाच्या कबरीची मदत तात्काळ थांबवा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भरघोस मदत करा !- हिंदु जनजागृती समितीची मागणी

वरसोली येथे पाठांतर स्पर्धा संपन्न

पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याला जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी आल्यानंतर 24 तासात पाणी पुरवठा करण्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश

भारतीय जनगणना २०२७’ विषयक प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta