vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपये, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या -मंदिराला फक्त २५० रुपये?औरंगजेबाच्या कबरीची मदत तात्काळ थांबवा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भरघोस मदत करा !- हिंदु जनजागृती समितीची मागणी

औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपये, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या -मंदिराला फक्त २५० रुपये?औरंगजेबाच्या कबरीची मदत तात्काळ थांबवा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भरघोस मदत करा !- हिंदु जनजागृती समितीची मागणी

राज्य प्रतिनिधी-  औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व खात्याकडून दरवर्षी लाखो रुपयांची मदत केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, २०२१-२२ मध्ये तब्बल ₹२,५५,१६० तर २०२२-२३ (नोव्हेंबरपर्यंत) ₹२,००,६२६ खर्च करण्यात आला. अशाप्रकारे आतापर्यंत ६.५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी केवळ ₹२५० इतकाच तुटपुंजा निधी राज्य सरकारकडून दिला जातो.

    ही गोष्ट अत्यंत संतापजनक असून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म व महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांच्या मंदिराला शासनाकडून योग्य निधी दिला जात नाही. उलट, औरंगजेबासारख्या क्रूर आक्रमकाच्या कबरीच्या देखभालीसाठी मोठा निधी दिला जात आहे. ज्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार केले, अशा औरंगजेबासाठी हा खर्च करणे योग्य आहे का?

  हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ही मदत तातडीने थांबवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरघोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. सरकारने त्वरित यात लक्ष घालून महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करावा असेही समितीने म्हटले आहे.श्री. सुनील घनवट,राज्य संघटक, हिंदू जनजागृती समितीसंपर्क

संबंधित पोस्ट

कामोठेत पनवेल महापालिकेचे सर्वात मोठे अग्निशमन केंद्र लवकरच उभारले जाणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्‍ट्र लोकभवनाच्या पुढाकाराने बृहन्‍मुंबई महानगरपालिका मंगळवारपासून ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करीत असून अभियानाचा आरंभ राज्‍यपाल जिष्‍णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता (दि. २६ मे) धारावी व सायन येथे

महिला सक्षमीकरणावर राज्य सरकारचा भर–महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे,माणगाव येथे विविध विकासकामांचा लोकार्पण व शुभारंभ संपन्न

सातत्य, एकाग्रता आणि समर्पण ही यशाची त्रिसूत्री – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ‘एनएडीपी’त दीक्षान्त समारंभ उत्साहात

अर्ज द्या कर्ज घ्या’ उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरीत द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुका, मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना 20 व 21 ऑगस्ट रोजी सुट्टी