vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

गोरोबा काकांच्या अभंगात भक्ती व प्रेमाची अनुभूती : भास्करराव दानवे कुंभार समाज सामाजिक संस्थेतर्फे पुण्यतिथी साजरी

गोरोबा काकांच्या अभंगात भक्ती व प्रेमाची अनुभूती : भास्करराव दानवे कुंभार समाज सामाजिक संस्थेतर्फे पुण्यतिथी साजरी

 

जालना (प्रतिनिधी) : वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध संत , विठ्ठलाचे निष्ठावान भक्त गोरोबा कुंभार यांनी आपल्या अभंगातून विठ्ठलाचे प्रेम आणि भक्ती व्यक्त केली.भक्ती आणि वैराग्याने संतांच्या मंडळीत एक विशेष स्थान मिळवलेल्या गोरोबा काकांची पुण्यतिथी पुढील वर्षी अधिक जोमाने साजरी करावी, आयोजनात आपले पूर्ण सहकार्य राहील. अशी हमी भारतीय जनता पक्षाचे जालना विधानसभा प्रमुख भास्करराव पाटील दानवे यांनी दिली.

महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने संत गोरोबा काका यांच्या 708 व्या पुण्यतिथी निमित्त प्रतीवर्षाप्रमाणे यंदा ही शनिवारी ( ता.26) कुंभार समाज सामाजिक संस्थेचे मराठवाडा अध्यक्ष दिगंबरराव पेरे यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे जालना विधानसभा प्रमुख भास्करराव पाटील दानवे, जालना मर्चंट्स को- ऑप. बँकेचे संचालक अंकुशराव राऊत,शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, दिगंबर पेरे,जिल्हाध्यक्ष तथा सरपंच बद्रीनारायण भसांडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांनी संत गोरोबा काकांची परमार्थिक पदवी ही उच्च दर्जाची होती.त्यांनी भक्तीचे वैभव मिळवले होते, असे सांगून पुण्यतिथीच्या उपक्रमांना आपले पूर्ण सहकार्य राहील असे पाचफुले यांनी सांगितले.

या प्रसंगी संजय शहाणे, कृष्णा पांगारकर, काशिनाथ बेनिवाल , राम शहाणे, बालाजी घोडके, मनोज वर्मा या भजनी मंडळाने विठ्ठल नामाचा गजर, गोरोबा काकांचे अभंग, भजने म्हंटली, महाआरती, व शेवटी भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात आला.या वेळी युवा जिल्हाध्यक्ष कृष्णा संत्रे, अरुण पेरे,संजय गोडबोले,जगन गोधेकर, लोकेश पेरे,मनोज गोदेकर, शुभम जोरले,अशोक गोधेकर, नरेश पेरे,राहुल गोदेकर,मंगेश पेरे,

सुखदेव बजाज ,राजू पलय्ये, गौरव गोदेकर, श्याम शहाणे , शंकर कंकाळ, संजय शहाणे, नंदकिशोर येन्नावार यांच्या सह भाविक आणि कुंभार समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

000000

संबंधित पोस्ट

शिवसेना दलित आघाडीचा हजारो भुमिहिनांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा-रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा…

चिखली तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिराचे’ आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ एकाच छताखाली लाभ; शिबिराचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्राने स्वच्छतेच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत *भारताच्या सर्वात ‘स्वच्छ राज्य’चा प्रतिष्ठेचा किताब पटकावला! राज्यातून – 1 सेवन स्टार, 2 फाइव स्टार, 82 वन स्टार गार्बेज फ्री शहरांचा दर्जा आणि 261 ओडीएफ़ प्लस प्लस शहरांचा मान मिळाला

जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह ८ ते १४ एप्रिल दरम्यान साजरा होणार सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांची माहिती

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी-प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta