vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवसेना दलित आघाडीचा हजारो भुमिहिनांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा-रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा…

 शिवसेना दलित आघाडीचा हजारो भुमिहिनांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा-रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा…

जालना, (प्रतिनिधी)-शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारीजालना कार्यालयासमोर दलित आदिवासी भूमीन कास्त पट्टे नावे करून सातबारामिळण्याबाबत व इतर मागण्या संदर्भात दलित आदिवासी नेते तथा शिवसेना दलितआघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड.भास्करराव मगरे यांच्या नेतृत्वात जन आक्रोश

आंदोलन तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणातील जैनपूर कोठार दलित आदिवासी कास्टपट्टे जिल्हा प्रशासनाकडून अत्याचार व बेदखल केल्याप्रकरणी आज अंबडचौफुलीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाहोता. दरम्यान यावेळी प्रचंड उन्हात भुमिहिन गायरानधारकांची तोबा गर्दी होती.जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनातशिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांनी म्हटलेआहे की, शिवसेना दलित आघाडीच्या वतीने भुमिहिन बेघर, जिल्हा स्तरावर सौरऊर्जेचा प्रकल्प दलित आदिवासी कास्त पट्टे न्याय प्रविष्ट असतानाबळजबरी ताब्यात घेत असल्याचे प्रशासनाच्या विरोधात तसेच जेनपुर (कोठारा)येथील जालना वरिष्ठ न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना भोकरदन पोलिस ठाण्यामार्फत ताबा करुन भुमिहिनांचा घरे पाडून निर्वासित केले आहे. त्या विरोधात आज शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अति विराट जनआक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. दलित आदिवासी भूमिहीन बेघर निराधारयांच्या न्याय हक्कासाठी व तसेच जिल्हा स्तरावर सौऊर्जेचा प्रकल्प दलितआदिवासी कास्त पट्टे न्याय प्रविष्ट असताना बळजबरी ताब्यात घेत असल्याचेप्रशासनाचे विरोधात तसेच जेनपुर (कोठारा) येथील जालना वरिष्ठ न्यायालयातन्यायप्रविष्ट असताना भोकरदन पोलिस ठाण्यामार्फत ताबा करून स्थानिक दलित आदिवासी भूमिहीन कास्तकरांचे कोंबड्या, बकर्‍या, घरे पाडून निर्वासितकेले आहे. त्यामुळे या दलित दलित आदिवासी भुमिहिनांना न्याय देण्या यावा.शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता दलित आदिवासी भूमीन कास्तकारांना वेधखलकरण्याची धमकी देऊन शासकीय प्रकल्पाच्या नावाखाली दलित आदिवासी भूमीहीनकास्तकरांचा छळ केल्या जात आहे पोलिसान मार्फत दलित आदिवासी भूमी यांच्याजमिनी काढून घेण्यात येत आहेत. वेळप्रसंगी अमानुष मारहाणी होत आहे हेकुठेतरी शासनाने थांबवायला पाहिजे. दलित आदिवासी भूमीन कास्तकार कायदेशीरमार्गाने प्रकरणे न्याय प्रविष्ट असताना कसले प्रकारचे चौकशी न करता वनोटीस न देता पोलीस बाळाचा वापर करून दलित आदिवासींना त्रास दिल्या जातो.आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांना निवारा देखील नाही काहीमहिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. तेव्हा मौजे जयपूर कोठारी येथील दलितआदिवासी भूमिहीन कास्तकारांनी राहायचे कुठे आणि खायचे काय हा प्रश्ननिर्माण झाला आहे आणि म्हणून या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसयांनी हा विषय गांभीर्याने घेऊन मौजे जैनपूर कोठारा येथील न्याय प्रविष्टप्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावीआणि मौजेजैनपूर कोठारा येथील दलित आदिवासी भूमी कास्तकारांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा.निराधार योजनेतून निराधारांना मासिक देय अनुदान १५०० ऐवजी तीन हजार रुपयेदेण्यात यावेत कारण निराधार योजनेत संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीयवृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना वइंदिरा गांधी राष्ट्रीय अंध व दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेचा समावेश आहे

यामध्ये सर्व योजनांमध्ये लाभार्थ्यांना १५०० रुपये मासिक देय अनुदानमिळते त्याऐवजी ३००० रुपये मासिक दे अनुदान देण्यात येऊन उत्पन्नाची अटशिथिल करण्यात यावी. या व इतर मागण्या कायदेशीर संदर्भीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीयासंदर्भात गांभीर्याने विचार करून प्रशासनास आदेशित करून राज्यात दलित

आदिवासी भूमि: भूमिहीन कास्ट पट्टे नावे करून सातबारा देण्यात यावा व शासकीयपडीत जमिनीवर शेतीसाठी झालेले अतिक्रमण नियमानुकुलित करावे तसेचजनहिताच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी बेकायदेशीररामनगर येथील सातबारा चौकशी करून न्याय प्रविष्ट प्रकरणातीललाभार्थ्यांना सातबारावर घेण्याचे आदेश देण्यात यासाठी जिल्हाधिकारीकार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे,अण्णासाहेब बाळराज, जय खरात यांच्यासह हजारो भुमिहिन कास्तकरांचीउपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

ग्रंथ पूजन करून ग्रंथोत्सव 2024 चे उद्घाटन संपन्न

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले

vishwatmaklokswamivarta

गाजीपुर अपघातग्रस्त रुग्णाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचालएकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी दिनांकात बदल21 डिसेंबरला होणार मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

भारतीय जनगणना २०२७’ विषयक प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta