vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचालएकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचालएकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:-शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची संपूर्ण प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी एकाच दिवशी श्रमदान कार्यक्रम राबवून 778 ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिली आहे.

यामुळे ग्रामपंचायती जलसमृ़द्ध होण्यास मदत होणार असून त्यांची पाण्याची समस्या दूर होणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत हा विशेष उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारणे तसेच ग्रामीण भागात जलसंधारणास चालना देणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी, अधिकारी व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

यानिमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भासले, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी महाड व पोलादपूर तालुक्यात बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्याचप्रमाणे येथील विविध ग्रामपंचायतींना भेट देत समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या उपक्रमांचा आढावा घेउन ग्रामस्थांशी संवाद साधला.

मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) , सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची मुदत शासनाने वाढविली असल्याने रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी अशाच उत्स्फूर्तपणे व नियोजनबद्ध पद्धतीने उर्वरित कामे पूर्ण करावीत असे आवाहन केले.

अलिबाग तालुक्यातील 62 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 62, कर्जत तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 55, खालापूर तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 44, महाड तालुक्यातील 134 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 83, माणगाव तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 57, म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 39, मुरुड तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 50, पनवेल तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 70, पेण तालुक्यातील 65 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 72, पोलादपूर तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 33, रोहा तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 61, श्रीवर्धन तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 39, सुधागड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 36, तळा तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 39, उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 4, अशा एकूण 811 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 778 वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.

०००००००

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना सभापती राम शिंदे यांच्याकडून अभिवादन

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

श्री सेवागिरी प्रदर्शनात कृषि विभागाचा स्टॉल ठरतोय आकर्षण*

लाभार्थ्यांनी 20 तारखेपर्यत रास्तभाव धान्य दुकानातुन धान्य उचल करावी

vishwatmaklokswamivarta

31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतानिमित्त रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 17 फेब्रुवारीला

vishwatmaklokswamivarta