vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतानिमित्त रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतानिमित्त रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून

जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी 31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतानिमित्त रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून खारपाडा ते कशेडी (मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66), माणगांव-ताम्हाणी घाटमार्गे दिघी (रा.मा. क्र. 753-फ), कर्जत-पळसदरी-खोपोली-पालीफाटा-वाकण (रा.मा. क्र. 584-अ), वडखळ-अलिबाग (रा.मा. क्र. 166-अ), चौकफाटा-कर्जत राज्यमार्ग, अलिबाग-मुरुड राज्यमार्ग व अलिबाग-मांडवा या महामार्ग व राज्यमार्गांवरून दि.31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 08.00 वाजल्यापासून ते दि.01 जानेवारी 2026 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे.

रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याकारणाने दि.31 डिसेंबर 2025 रोजी “थर्टी फस्ट” चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागता करीता प्रचंड प्रमाणात पर्यटक हे मांडवा, किहीम, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरूड, दिवेआगर, श्रीवर्धन, महाड, कर्जत, माथेरान, खालापूर, इमॅजिका, पाली,महड, रायगड किल्ला अशा पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात आपआपली वाहने घेवून येत असतात. सध्या नाताळ निमित्ताने विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याकारणाने पर्यटक हे रायगड जिल्ह्यामध्ये फिरण्याकरीता वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावरील बीचला भेटी देत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असून त्यातच महामार्गावरील जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

ही वाहतूक बंदी दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जीवनाश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिकायांना लागू राहणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी नियोजन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

वसई महापालिकेच्या हद्दीतील बर्डपार्क उभारण्याची कार्यवाही करावी – पालकमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta

कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात येणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

युनेस्को मुख्यालयात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

मराठी तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे -मराठी पाऊल पडते पुढे या चर्चासत्रातील सूर..

vishwatmaklokswamivarta

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊमंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासनउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संवाद..

जिल्हाधिकाऱ्यांकडून राणीघाट अपघातातील जखमींची विचारपूस