vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

वसई महापालिकेच्या हद्दीतील बर्डपार्क उभारण्याची कार्यवाही करावी – पालकमंत्री गणेश नाईक

वसई महापालिकेच्या हद्दीतील बर्डपार्क उभारण्याची कार्यवाही करावी – पालकमंत्री गणेश नाईक

मुंबई, प्रतिनिधी : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना अनुकूल असणारी झाडे लावण्यात यावीत, असे निर्देश वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.मंत्री नाईक यांनी मंत्रालयात वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रातील विविध कामासंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

वसई विरार महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यामध्ये पिकनिक पार्कचे आरक्षण आहे. या सात एकर जागेवर बर्ड पार्क उभारण्यात यावे. यासाठी आवश्यक भूसंपादन व इतर कार्यवाही तातडीने करावी. पक्षांना अनुकूल असणारी झाडे शासकीय नर्सरीत नसतील तर खासगी नर्सरीतून अशी झाडे घेण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोज सुर्यवंशी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आदी उपस्थित होते.

आयुष्मान आरोग्य मंदिरांचे अनावरण वसई विरार महापालिकेच्या वतीने 11 आयुष्मान आरोग्य मंदिरांची उभारणी करण्यात आली आहे. या आरोग्य मंदिरांचे ऑनलाईन अनावर पालकमंत्री नाईक यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले

पालघर महापालिका हद्दीतील 117 शाळा व तीन आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेकडून महापालिकेकडे करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

००००

संबंधित पोस्ट

फळपिक विमा योजनेंतर्गत आंबिया बहारातील आंबा फळपिकासाठी सहभागाकरिता 30 नोव्हेंबर अंतिम मुदत..

vishwatmaklokswamivarta

सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नवी मुंबईकरांना मतदानाबाबत आवाहन

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनजवळ पार्किंग मध्ये मोठा स्फोट दिल्ली हादरली आठ मृत्युमुखी 24 जण जखमी. मुंबई ,उत्तर प्रदेश ,गुजरात हाय अलर्ट…

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटपजात पडताळणीची १६ हजारांहून अधिक प्रकरणे निकालीशासनाच्या सकारात्मक कार्यवाहीची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून माहिती ५७ लाख नोंदी जनतेसाठी संकेतस्थळावर उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

नांदेड शहरात जड वाहनांना #प्रवेशबंदी   

दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि मंत्रिमंडळाने  घेतली शपथ…

vishwatmaklokswamivarta