vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना सभापती राम शिंदे यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना सभापती राम शिंदे यांच्याकडून अभिवादन

 

बुलढाणा, प्रतिनिधी) : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तहसील चौक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेयावेळी बोलताना सभापती श्री. शिंदे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला. समाजकार्य, सुशासन, न्यायप्रियता आणि लोकहितकारी निर्णयांमुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या आदर्श विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सभापती राम शिंदे हे एकदिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनीही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत धर्म, समाजसेवा, लोककल्याण आणि विकासकामांना प्राधान्य देत आदर्श राज्यकारभाराची परंपरा निर्माण केली. त्यांच्या कार्याचा वारसा आजही समाजाला प्रेरणा देणारा ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

00000

संबंधित पोस्ट

आज 19 ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी…

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेत १६ वरिष्ठ भूवैज्ञानिकांची नियुक्ती राज्यातील विविध जिल्ह्यांत पदस्थापना; शासनाचा अधिकृत आदेश जारी…

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वाडा-भिवंडी रस्त्याचे काम गतीने करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

बालकामगार आढळल्यास थेट परवाना रद्द करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीची पुर्नगठीत करण्यासाठीइच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन