vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगली जिल्ह्यात विशेष महसूल लोकअदालतीचे आयोजनप्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने व गतीने मार्गी लावावीत- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

सांगली जिल्ह्यात विशेष महसूल लोकअदालतीचे आयोजनप्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने व गतीने मार्गी लावावीत- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

        सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यातील महसूल न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या आदेशान्वये जिल्हा, उपविभाग, तालुका व मंडळ स्तरावर विशेष महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घेऊन आपली प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने व गतीने मार्गी लावावीत, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

       महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या (Quasi-Judicial) न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले महसुली दावे व अपिले पक्षकारांच्या परस्पर संमतीने व तडजोडीने जलदगतीने निकाली काढण्यासाठी दिनांक 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राज्यभर ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यात पुढीलप्रमाणे महसूल लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे.

दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी अपर जिल्हाधिकारी स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे लोकअदालत होणार आहे. उपविभागीय कार्यालय – वाळवा/कडेगाव/जत/विटा स्तरावर 28 सप्टेंबर 2026 रोजी संबंधित उपविभागीय कार्यालयात, तर उपविभागीय कार्यालय मिरज अंतर्गत 23 सप्टेंबर 2026 रोजी तहसील कार्यालय कवठेमहांकाळ, 25 सप्टेंबर 2026 रोजी तहसील कार्यालय तासगाव आणि 28 सप्टेंबर 2026 रोजी उपविभागीय कार्यालय मिरज येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 24 सप्टेंबर 2026 रोजी तहसीलदार/ अपर तहसीलदार स्तरावर संबंधित तहसील / अपर तहसीलदार कार्यालयात आणि 21 सप्टेंबर 2026 रोजी मंडळ अधिकारी स्तरावर संबंधित मंडळ अधिकारी कार्यालयात लोकअदालत होणार आहे

    संबंधित नागरिकांनी अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी केले आहे

00000

 

संबंधित पोस्ट

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक -अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट!१० वर्षांत काशी आणि मथुरा मुक्त होतील!- अधिवक्ता आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद

मुंबईतील धारावी विभागामध्ये भाजपा वतीने तिरंगा यात्रा संपन्न

vishwatmaklokswamivarta

विशाल, अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; 18 प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी**•महाराष्ट्रात ₹2.56 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1 लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

vishwatmaklokswamivarta

धारावीतील एन शिवराज मैदानात 55 वा वृक्ष संवर्धन दिन स्वच्छता अभियान

कर्नाटकमध्ये  पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण गंभीर जखमी 

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी – राज्य निवडणूक आयुक्त

vishwatmaklokswamivarta