vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात कृषि दिनानिमित्त 15 लाख वृक्षारोपण,संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे   – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- लोकप्रतिनिधी, खाजगी संस्था, एनजीओ यांचा सहभाग घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करा

जिल्ह्यात कृषि दिनानिमित्त 15 लाख वृक्षारोपण,संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे   – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- लोकप्रतिनिधी, खाजगी संस्था, एनजीओ यांचा सहभाग घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करा

 सांगली, प्रतिनिधी) : राज्याचे वनाच्छादन व वृक्षाच्छादन सन 2047 पर्यंत एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के पर्यंत वाढविण्याकरिता संपूर्ण राज्यात सन 2026 ते सन 2047 पर्यंत 300 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याअनुषंगाने सांगली जिल्ह्यात सन 2026 मध्ये कृषी दिनाचे औचित्य साधून दिनांक 1 जुलैपासून 15 लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेऊन संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे. वृक्षारोपणासाठी लोकप्रतिनिधी, खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे केले.

300 कोटी वृक्षारोपण अभियानाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उपवनसंरक्षक सागर गवते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, सामाजिक वनीकरण सांगलीचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरूडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा सहआयुक्त नगरविकास दत्तात्रय लांघी, सहायक वनसंरक्षक मयुर शेळके तसेच विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष तर दूरदृष्यप्रणालीव्दारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मुख्याधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, कृषी दिनाचे औचित्य साधून 15 लाख वृक्षारोपण करण्याच्या दृष्टीने पोटखराब जमीन निश्चित करावी. रोपांचे संवर्धन योग्यरित्या होण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणासाठी जमीन निवडताना पाण्याचा स्त्रोत जवळ असेल अशा पध्दतीने निवड करावी. महापालिका, नगरपालिका /नगरपरिषद /नगरपंचायत, ग्रामपंचायत क्षेत्रात वृक्षारोपणासाठी जमिनीची निवड संबंधित विभागांनी काळजीपूर्वक करावी. प्रत्येक विभागाने येत्या 10 जून पर्यंत जागा सुनिश्चित करावी. वृक्षारोपणासाठी रोपे उपलब्धतेचे नियोजन करून संबंधित ठिकाणी रोपे दोन ते तीन दिवस अगोदर पोहचतील यादृष्टीने संबधित विभागांनी कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी विभागीय वन अधिकारी प्रशांत वरूडे यांनी 300 कोटी वृक्षारोपण मोहिमेच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण केले. यावेळी त्यांनी वृक्षारोपणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी केलेल्या नियोजनाबद्दल सविस्तर माहिती दिली.

0000

 

000000

संबंधित पोस्ट

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

शबरी नॅचरल्स’चा डंका आता दिल्लीपर्यंत; केंद्रीय जनजातीय संचालक डॉ. वर्नाली डेका यांच्याकडून कौतुकाची थाप

जारीदासह परिसरातील ५० गावांसाठी खात्रिशीर विजेची सोय झाल्याने मेळघाटातील आदीवासी बांधव आणि महावितरणकडून मा. सरन्यायाधिश भुषण गवई यांचे आभार

vishwatmaklokswamivarta

धारावी काळा किल्ला डेपोतून निघणाऱ्या 90 फूट मार्गे सायन मार्गे जाणाऱ्या बस गाड्यांना 90 फूट मार्गावरील सर्व बस थांबा येथे थांबवण्याची मागणी..

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कायद्याचा धाक निर्माण करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ…