vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

भातकुली तालुक्यातील बोरखडी खू व इस्माइलपुर ठरले स्व गणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले गाव..

भातकुली तालुक्यातील बोरखडी खू व इस्माइलपुर ठरले स्व गणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले गाव..

राज्य प्रतिनिधी- भारत सरकारच्या जनगणना विभागामार्फत दिनांक 1 मे पासून स्व गणना सुरू झालेली आहे.याबाबत जिल्हाधिकारी अमरावती यांनी नागरिकांना स्व गणना पूर्ण करण्याचे आवाहन केले होते.सदर आव्हानाला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत भातकुली तालुक्यातील बोरखडी खू व इस्माइलपुर या गावातील सर्व कुटुंबांनी स्व गणना पूर्ण केली.अशा प्रकारे 100% स्व गणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले गाव बोरखडी खू व इस्माइलपुर ठरले.

या गावांचा आदर्श घेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुटुंबांनी 15 मे पर्यंत स्व गणना पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमरावती यांनी केले.निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे व तहसीलदार अक्षय मांडवे यांचे मार्गदर्शनात सदर काम पूर्ण करण्यात आले. मंडळ अधिकारी संतोष धुर्वे,गौरव सुरपाटणे,ग्राम महसूल अधिकारी व्ही बी बिहाडे, व्हि. बी दहाट, धम्मपाल वानखडे,महसूल सेवक सीमा वानखडे,प्रशांत बिरे यांनी याबाबत विशेष परिश्रम घेतले.

 

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री कृती कार्यक्रमांतर्गत आदिवासी भागात सौरऊर्जेचा प्रभावी उपयोग — जिल्हाधिकारी किशन जावळे

सातारा जिल्हा पोलीस क्रेडिट को-ऑप. सोसायटीतर्फे भव्य विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

फलटण शहरातील मलटण परिसराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे वाहून गेली होती परंतु फलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचारी यांनी शर्तीने 24 तासांमध्ये सदरची पाईपलाईन दुरुस्त करून सर्व शहराचा पाणीपुरवठा चालू केला

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान; ‘कसं काय?’ मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरावेत

शेतकऱ्यांसाठी भारतीय कपास महामंडळानेकापूस किसान मोबाईल अँप केले विकसीत

vishwatmaklokswamivarta