vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शालेय राज्यस्तर मल्लखांब स्पर्धा -मुलांच्या गटात कोल्हापूर तर मुलींच्या गटात मुंबई विभागास विजेतेपद- जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या संघांना व खेळाडुंना पारितोषिक वितरण..

शालेय राज्यस्तर मल्लखांब स्पर्धा -मुलांच्या गटात कोल्हापूर तर मुलींच्या गटात मुंबई विभागास विजेतेपद- जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या संघांना व खेळाडुंना पारितोषिक वितरण..

        सांगली, प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय 19 वर्षाखालील शालेय मुला-मुलींच्या मल्लखांब स्पर्धेत मुलांच्या गटात कोल्हापूर विभाग तर मुलींच्या गटात मुंबई विभाग अव्वल ठरला. विजयी संघ व खेळाडूंना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

      तालुका क्रीडा संकुल, मिरज येथे राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या आठ विभागातून खेळाडू सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर व क्रीडा अधिकारी, खेळाडू, व्यवस्थापक, पंच, निवड समिती सदस्य उपस्थित होते.

     मुलांच्या गटात वैयक्तिक प्रकारात प्रथम क्रमांक आयुष काळंगे, द्वितीय क्रमांक वेदांत कदम, दोन्ही कोल्हापूर विभाग. तृतीय क्रमांक निरंजन अमृते, मुंबई विभाग व चतुर्थ क्रमांक वेदांत वाडेकर, पुणे विभाग यांनी विजयश्री प्राप्त केली, तर मुलांच्या सांघिक विजेतेपदांमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक कोल्हापूर, द्वितीय पुणे व तृतीय मुंबई विभाग यांनी यश मिळवले.

  मुलींच्या गटामध्ये वैयक्तिक प्रकारामध्ये प्रथम क्रमांक समिक्षा सुरडकर, द्वितीय धनश्री जाधव, तृतीय क्रमांक खुशी पुजारी सर्व मुंबई विभाग व चतुर्थ क्रमांक कृष्णाली क्षीरसागर कोल्हापूर विभाग यांनी विजय संपादन कैला. तर सांघिक प्रकारांमध्ये अनुक्रमे प्रथम मुंबई विभाग, द्वितीय पुणे विभाग व तृतीय क्रमांक कोल्हापूर विभाग यांनी पटकावले.

  या स्पर्धेतील विजयी खेळाडू उज्जैन (मध्य प्रदेश) या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत, मुलींच्या गटामध्ये समिक्षा सुरडकर, धनश्री जाधव, खुशी पुजारी सर्व मुंबई विभाग व कृष्णाली क्षीरसागर कोल्हापूर विभाग. मुलांच्या गटात आयुष काळंगे व वेदांत कदम दोन्ही कोल्हापूर विभाग, निरंजन अमृते मुंबई विभाग व वेदांत वाडेकर पुणे विभाग अशी त्यांची नावे आहेत.

    या स्पर्धेसाठी निवड चाचणी सदस्य म्हणून सुमित शेंडगे (सातारा), बाबासाहेब समलेवाले (सांगली) व विनायक राजमांचीकर (पुणे) यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच तालुका क्रीडा संकुल मिरज येथील कर्मचारी आणि सांगली जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

00000

संबंधित पोस्ट

अतिवृष्टीमुळे औद्योगिक वसाहतीस संलग्न गावे व शेतीला अपाय होणार नाही याची दक्षता घ्या-उद्योग मंत्री उदय सामंत..

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाहीअपमानित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या मुजुमदार पार्क सोसायटीतील प्रथम वर्षीय सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात…

vishwatmaklokswamivarta

आपत्ती निवारणासाठी प्रशासन अलर्ट; पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश दारव्ह्यातील दहेली येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक, आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांचा घेतला आढावा

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण ११ हजार १९७ प्रकरणे निकाली**१६ कोटी ६० लाख १४ हजार ९६६ रुपयाची तडजोड रक्कम वसूल*

विशेष लेख – जळगाव जिल्ह्याला मिळेल विकासाची सोनेरी झळाळी…!

vishwatmaklokswamivarta