vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नैना क्षेत्रातील नगर रचना योजनांमधील त्रुटी दूर करून ग्रामस्थांना मालमत्ता पत्रक वाटप करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नैना क्षेत्रातील नगर रचना योजनांमधील त्रुटी दूर करून ग्रामस्थांना मालमत्ता पत्रक वाटप करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी : नवी मुंबईतील नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्ल्यूएन्स नोटीफाईड एरिया) क्षेत्रातील गावांच्या नगर रचना योजनांना तातडीने मंजुरी द्यावी. तसेच मंजूर असलेल्या योजनांमधील त्रुटी दूर करून ग्रामस्थांना मालमत्ता कार्डांचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिडको-नैना अंतर्गत गावांच्या प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील यांच्यासह सिडकोचे व्यस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल आदि उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून नैना क्षेत्रातील नगर रचना योजना प्रलंबित आहेत. मंजूर केलेल्या योजनांमध्ये त्रुटी असल्याचे नागरिक व लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. यासंदर्भात प्रत्यक्ष स्थळावर जाऊन सर्वेक्षण करून त्रुटी दूर कराव्यात. तसेच जमीन मोजणीसाठी आता शासनाने खासगी यंत्रणांना मंजुरी दिली आहे. त्यांच्या मार्फत या क्षेत्रातील जमिनींची मोजणी करावी. नैना क्षेत्रातील तसेच विविध महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, वाहतूक, पार्किंग, रस्ते, विकास आराखडा आणि पायाभूत सुविधांचा एकत्रित विचार करून नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लवकरात लवकर नैना क्षेत्रातील नगर रचना योजनांना मंजुरी देण्याची सूचना केली. आवश्यक असल्यास मनुष्यबळ वाढवावे. गावकऱ्यांना पात्रतेनुसार जमिनीचे वाटप करून पारदर्शकता ठेवावी. तसेच नैना क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणावर शहरे आणि प्रकल्प उभे राहणार असतील, तर त्यासाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन आधीच करणे आवश्यक आहे. कोंढाणे, केटवणे, बाळगंगा आदी जलस्रोतांचा विचार करून दीर्घकालीन पाणीपुरवठा आराखडा तयार करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

0000

संबंधित पोस्ट

पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण,पुण्याला देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न -मुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार-राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

vishwatmaklokswamivarta

प्रशासनाच्या तत्पर मदतकार्यामुळे जिल्ह्यातील २२७ पूरग्रस्तांची सुटका पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मदतीसाठी प्रशासन तत्पर !

vishwatmaklokswamivarta

विधानसभेत दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थानाचा विधानसभाध्यक्षांचा प्रस्ताव

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची अपघातग्रस्त युवकांच्या आरोग्याची विचारपूस, दिलासा आणि धीर

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि सरंक्षण विशेष अध्यासन केंद्र ’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उदघाटन”मातृभाषेचा अभिमान बाळगतांना अन्य भाषांचा सन्मान करावा”- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस