vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त सेवा हक्क दिन*12 मे पर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन

सेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त सेवा हक्क दिन*12 मे पर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन

 

अमरावती, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंमलबजावणीला दहा वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने दि. 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच दि. 28 एप्रिल 12 मेपर्यंत सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे.

सेवा हक्क दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकसेवा प्रदान करण्याच्या कामगिरीमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर सेवा प्रदान करण्याच्या कामगिरीत उल्लेखनीय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ग्रामपातळीवर सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या ठळक वैशिष्ट्यांचे वाचन करण्यात येणार आहे.

सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना सेवेची शपथ देण्यात येणार आहे.

सेवा पंधरवड्यामध्ये दि. 25 एप्रिल 2025 पर्यंतच्या प्रकरणावर कार्यवाही पूर्ण करण्याची सूचना देण्यात आल्या आहे. यामध्ये विविध सेवांचा समावेश आहे.

सेवा हक्क दिनानिमित्त सेवा हक्काबाबत जनजागृतीसाठी राज्यसेवा हक्क आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी यवतमाळ आणि अकोला यांची मुलाखत दि. 28 एप्रिल रोजी अमरावती, यवतमाळ आणि अकोला आकाशवाणी केंद्रावरून सकाळी दहा वाजता प्रसारित होणार आहे. मुलाखतीमध्ये कायद्यातील तरतुदी आणि अंमलबजावणीची माहिती देण्यात येणार आहे.

तसेच सेवा पंधरवड्यामध्ये नागरिकांनी प्रलंबित असलेल्या त्यांच्या सेवा प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन अमरावती राज्यसेवा हक्क आयुक्त कार्यालय यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५जिल्ह्यात एकूण ७०.२६ टक्के मतदान १ लाख ६६ हजार ८५८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील ५० गावे आणि शंभर अंगणवाड्या स्मार्ट इंटेजिलंट व्हाव्यात – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर!*_*मणिपुरी थांग-ता, शिवकालीन युद्धतंत्र व अफजलखान वधाचे थरारक सजीव प्रात्यक्षिक!*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राटडॉ. मिर्झा यांचे अमरावती येथे निधन

vishwatmaklokswamivarta

बातमी संदर्भात माहिती घेत असतांना गुत्तेदाराची शिवीगाळ, धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

संवाद मराठवाड्याशी” उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार विभागातील गरजू शेतकऱ्यांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद..