vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी १५ हजारांचे अर्थसहाय्य; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी १५ हजारांचे अर्थसहाय्य; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-जिल्हा परिषदेच्या सहायक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी स्वयंरोजगार साधनसामग्री (Toolkit) खरेदी करण्याकरिता नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.पात्र लाभार्थ्यांना साधनसामग्रीसाठी कमाल १५,००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे.

यात अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे आणि त्याने शासकीय किंवा शासनमान्य संस्थेतून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.

 प्रशिक्षित दिव्यांग महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाईल. अर्ज करण्याची मुदत २५ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत आहे.अर्जदारांनी ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले युडीआयडी (UDID) प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, प्रशिक्षण प्रमाणपत्र, बँक पासबुक प्रत आणि घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे जोडून अर्ज ‘सहायक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर’ येथे सादर करावा.जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. बाबासाहेब अरवत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’चा उत्साहात शुभारंभ;शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली – आमदार संजय गायकवाड

अनंत चतुर्दशी दिनी होणा-या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुव्यवस्थित नियोजन

vishwatmaklokswamivarta

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा मागण्या मान्य न झाल्यास जालना जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा इशारा…

vishwatmaklokswamivarta

पाणी पुरवठा योजनांची अपूर्ण कामे वेगात पूर्ण होण्यासाठी विभागीय आयुक्तांना अतिरिक्त अधिकार – मंत्री गुलाबराव पाटील

ठाणे जिल्हा परिषदेच्या केंद्र प्रमुखांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर..

vishwatmaklokswamivarta

राज्यात ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’ मोहीम राबविणार- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

vishwatmaklokswamivarta