vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन कामाला गती द्यावी* – *पालकमंत्री शंभूराज देसाई* 

किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन कामाला गती द्यावी* – *पालकमंत्री शंभूराज देसाई*

 

सातारा प्रतिनिधी- किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचे काम संथ गतीने सुरू आहे. या कामाला गती देण्याबरोबरच हे काम दर्जेदार करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी किल्ले प्रतापगड येथे सुरू असलेल्या संवर्धन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, विजय नायडू यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व किल्ले प्रतापगड येथील नागरिक उपस्थित होते

किल्ले प्रतापगड संवर्धनाच्या बांधकामाला पाणी मारत नसल्याच्या तक्रारीवरून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, किल्ले प्रतापगडावर कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, तरी संबंधित ठेकेदाराने टँकरने पाणी आणून पाणी मारावे. संवर्धनाच्या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष आहे. तरी संवर्धनाच्या कामाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्याप्रमाणे किल्ले प्रतापगड होता त्याच पद्धतीने संवर्धनाचे काम झाले पाहिजे. किल्ल्यावरील झाडेझुडपे काढून संवर्धनाचे काम करावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ जास्तीत जास्त झाडे लावावी. संवर्धनाच्या कामाच्या निधीसाठी पाठपुरावाही केला जाईल अशी ग्वाहीही पालकमंत्री श्री देसाई यांनी पाहणी दरम्यान दिली.

000

संबंधित पोस्ट

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव या अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत राहून आरोग्यसेवेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या सात आरोग्य योद्ध्यांचा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार

नागपूर बुक फेस्टिव्हल – २०२५’ अंतर्गत चार दिवसीय ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

vishwatmaklokswamivarta

शेवटच्या घटकाचा विचार हाच खरा न्याय – न्यायमूर्ती अनिल किलोर बल्लारपूर येथे दिवाणी न्यायालय नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघात प्रकरणी खासदार डॉ. कल्याण काळे यांची ठोस भूमिका – दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, पीडितांना मोठ्या आर्थिक मदतीची मागणी

४५ वे वार्षिक पुष्पप्रदर्शन ८ व ९ फेब्रुवारी रोजी; सहभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ इथं ब्रिक्स शिखर परिषदेत ‘पर्यावरण, COP30 आणि जागतिक आरोग्य’ या विषयावरील सत्राला संबोधित केलं. यातील महत्त्वाच्या मुद्दे..