vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

४५ वे वार्षिक पुष्पप्रदर्शन ८ व ९ फेब्रुवारी रोजी; सहभागाचे आवाहन

४५ वे वार्षिक पुष्पप्रदर्शन ८ व ९ फेब्रुवारी रोजी; सहभागाचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग उपवने व उद्याने यांच्या वतीने शनिवार दि.८ व रविवार दि.९ फेब्रुवारी २०२५ रोजी ४५ व्या विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन व उद्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत व प्रदर्शनात अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन सहायक संचालक जे. व्ही. चौगुले यांनी केले आहे.

इच्छुक स्पर्धकांसाठी प्रवेशिका देणे व स्विकारण्यासाठी देण्यात आलेला कालावधी याप्रमाणे-

पुष्प प्रदर्शन स्पर्धा दि.२७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी

 उद्यान स्पर्धा दि.२७ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शनात गुलाबपुष्पे फुलदानातून, मोसमी फुले, बहुवार्षिय फुले, कॅक्टस व सकुलंट, कुंड्यातील शोभीवंत झाडे, लॅण्डस्केप ऑन द स्पॉट, कलात्मक पुष्परचना, उद्यान स्पर्धा इ. विभाग आहेत. प्रत्येक विभागातील विजेत्यास एक चषक, पुष्पप्रदर्शनात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या स्पर्धकास उपवने व उद्याने विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी पुरस्कृत केलेला फिरता चषक प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेतील व सर्व गटांकरता वेगवेगळी परितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच पुष्परचना, पुष्प रांगोळी या विभागासाठीही पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.उद्यान स्पर्धा ह्या उद्यानाचा प्रकार आकार अशा वेगवेगळ्या गटांमध्ये असून स्पर्धेत भाग घेतलेल्या उद्यानांचे परीद्क्षण दि. ५ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येईल. प्रवेशिका सहाय्यक संचालक, उपवन व उद्याने यांचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक विभाग, मध्यवर्ती इमारत(विस्तार) अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर येथे स्विकारण्यात येतील.

पुष्पप्रदर्शनाबाबत अधिक माहितीसाठी सहायक संचालक जे. व्ही. चौगुले ८६९८०७०८८२, उद्यान अधीक्षक एस.टी. जाधव ९१७२५५९७९८, एस.टी. काळे ९४२१३०७५७५ यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह नांदुरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस,राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

बोईसर – तारापूर एमआयडीसीतील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करा – आमदार विलास तरे# स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार व ग्रामपंचायतींना मोफत पाणीपुरवठा देण्याची आग्रही भूमिका…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) भेट

कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचा दर जाहीर न झाल्यामुळे   शेतकरी संघटनांनी ऊस वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय केल्याने वाहतूक ठप्प…

vishwatmaklokswamivarta

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा सहकारी बँकेला आता शक्तीशाली जोड – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta