vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

नगरविकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा-छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड, लातूर विजेते…

नगरविकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा-छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड, लातूर विजेते…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-नगर विकास विभागामार्फत रविवार दि.१९ व सोमवार दि.२० असे दोन दिवस विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धांचे उद्घाटन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यास्पर्धांमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व नगरपरिषद ,नगरपंचायतीचे सुमारे ६०० कर्मचारी सहभागी झाले.

अंतिम विजेतेसंघ याप्रमाणे-

क्रिकेट- जालना, कबड्डी- धाराशिव, व्हॉलीबॉल- नांदेड, रिले ४x४०० मी. (पुरुष)- छत्रपती संभाजीनगर, रिले ४x१०० मी. (पुरुष)- नांदेड, रिले ४x१०० मी. (महिला)-छत्रपती संभाजीनगर, रस्सीखेच (पुरुष)- लातूर, रस्सीखेच (महिला)- छत्रपती संभाजीनगर.स्पर्धेनंतर विजेत्यांना सह आयुक्त देविदास टेकाळी, सहा. आयुक्त संजय केदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.०००००

संबंधित पोस्ट

आजची मोठी बातमी -पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला सर्व आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता. 20 वर्षांनी लागला निकाल…

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान प्रभावीपणे राबवा; ध्वज संहितेचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडून आयआरसीटीसीच्या ‘वॉर रूम’चा आढावा; खानपान सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रवाशांचे अभिप्राय आणि स्वयंपाकघरांवरील देखरेख यंत्रणा अधिक बळकट करण्याचे निर्देश.

मेळघाट हाटमध्ये खादी महोत्सवाला सुरवात खादीचा वापर वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत,सांगली जिल्हा राज्यात अव्वल- जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

महिला व बालविका स मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते १ मे रोजी मुख्य शासकीय ध्वजवंदन